मुंबई : एका हिंदू मुलीशी लग्न केल्यामुळे आपल्याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांनी पोलिसांत नोंदवलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री आएशा टाकिया आणि समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांच्या लग्नाला आता वर्षे उलटलीत... या जोडप्याला तीन वर्षांचा एक मुलगाही आहे. मात्र, इतक्या वर्षानंतरही फरहान आणि आएशाला आंतरधर्मीय विवाह केल्याबद्दल जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.


फरहान आझमी यांनी मुंबई पोलिसांना याबाबत लिखित स्वरुपात तक्रार दिलीय. याबद्दल पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केलीय. 'तू एका हिंदू मुलीशी विवाह केलाय... याचा परिणाम तुला भोगावा लागेल, अशी धमकी फोन करणाऱ्यांनी दिलीय' असं फरहान यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. ही धमकी एका कट्टरवादी हिंदू समूहाकडून आल्याचं फरहान यांचं म्हणणं आहे. 



आएशा डोर, टार्झन द वन्डर कार, वॉन्टेड अशा काही चित्रपटांत दिसली होती. लग्नानंतर मात्र तिनं बॉलिवूडपासून दूरावली होती. २००९ साली आएशानं फरहानशी निर्णय घेतला. आएशाचे पिता हिंदू आहेत तर तिची आई एक अँग्लो इंडियन होती. तर समाजवादी पक्षाशी निगडीत असलेल्या फरहान यांचा रेस्टॉरन्ट बिझनेस आहे.