कोणाची नजर काढत आहेत रेखा?
व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल....
मुंबई : बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाने चक्क एका अभिनेत्याची नजर काढली आहे. अभिनेता आदित्य पंचोली आणि अभिनेत्री जरीना वहाब यांचा मुलगा अभिनेता सुरज पंचोलीची रेखा यांनी नजर काढली आहे. सुरजच्या आगामी 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटाच्या स्क्रिनिंकमध्ये रेखा उपस्थित होती. रेखा आणि जरीन दोघी फोर जवळच्या मैत्रीणी आहेत.
रेखाने सुरज पंचोलीच्या पोस्टरची नजर काढली आहे. व्हिडिओमध्ये ती सुरजच्या फोटोला कुरवाळत त्यांची नजर काढताना दिसत आहे. 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
जम्मू काश्मीरच्या खोऱ्यांपासून ते नियंत्रण सीमेपर्यंत तनाव आहे. हा तनाव फक्त त्याच ठिकाणी नाही तर देशात देखील आहे. हे वास्तवदर्शी चित्र 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटाच्या माध्यमातून रेखटण्याचा प्रयत्न दिग्दर्शक इरफान कमल यांनी केला आहे.
इरफान खान दिग्दर्शित 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटाची निर्मिती मुराद खेतानी आणि अश्विन वर्दे यांची आहे. अभिनेता सुरज पंचोली आणि अभिनेत्री मेघा आकाश मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी 'सेटेलाइट शंकर' चित्रपटगृहात दाखल होणार आहे.