A R Rehman Birthday: जागतिक संगीत विश्वात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या संगीतकार ए.आर. रेहमान (A R Rehman) उद्या आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र आत्तापासूनच त्यांच्यावर सर्व क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  १९९२ सालापासून त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात करत विविधभाषी चित्रपटांमध्ये आपल्या संगीताची जादू केली. पाश्चात्त्य आणि भारतीय संगीताचा (Indian and Western Music) सुरेख असा मेळ साधत नवी धुन तयार करण्याकडे रेहमान यांचा नेहमीच कल असतो. चला तर मग, जाणून घेऊया संगीत क्षेत्रात आपलं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या रेहमान यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एआर रहमान यांचं खरे नाव दिलीप शेखर असल्याचं फार कमी लोकांना माहिती आहे. दिलीप यांचा जन्म ६ जानेवारी १९६७ रोजी झाला. दिलीप यांच्या वडिलांचं दीर्घ आजाराने निधन झाले. कुटुंबीय खूप अस्वस्थ झाले. कुटुंबाची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती.


रेहमान यांना संगीताचा वारसा वडिलांकडूनच मिळाला होता. त्यांचे वडील आर.के.शेखर हे तामिळ आणि मल्याळम चित्रपटांना संगीत द्यायचे. खुद्द रेहमानही बालपणापासून उत्कृष्ट की-बोर्ड वाजवायचे. त्यामुळे परिस्थितीनेही खऱ्या अर्थाने त्यांच्यातला संगीतकार घडला आणि पुढे यातच करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.  


दिलीप यांची बहीण आजारी पडली होती. त्यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब एका मुस्लिम पीराकडे गेलं. त्या पीरने त्यांच्या कुटुंबावर असा करिष्मा केला की कुटुंबाची परिस्थिती सुधारू लागली. बहिणीची तब्येत सुधारल्यावर आईला खूप आनंद झाला. या घटनेनंतर दिलीप यांच्या आईला वाटलं की, इस्लामने तिला तिच्या कठीण काळात साथ दिली. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारला.


धर्मांतरानंतर, 80 च्या दशकात, दिलीप यांचं संपूर्ण कुटुंब एका ज्योतिषाकडे गेलं, जिथे त्यांच्या आईने ज्योतिषाला तिच्या मुलीच्या लग्नाबद्दल अनेक प्रश्न विचारले. पण ज्योतिषाने मुलीपेक्षा आपल्या मुलामध्ये जास्त रस दाखवला आणि दिलीपला त्या काळात आपलं नाव बदलायचं होतं. ज्योतिषाला त्याचे नाव विचारण्यात आलं. जिथे ज्योतिषाने त्याला दोन नावं सांगितली.


मादिलीपने आपले नाव बदलून अल्लाह ठेवण्याचा विचार केला आणि त्याचे नाव "अल्लाह रखा रहमान" ठेवलं. नसरीन मुन्नी कबीर यांच्या 'एआर रहमान दं स्पिरिट ऑफ म्युझिक' या पुस्तकात रहमान म्हणतात की, एका हिंदू ज्योतिषाने मला मुस्लिम नाव दिलं.


२००८ साली प्रदर्शित झालेल्या 'स्लमडॉग मिलेनियर' या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रेहमान यांना ऑस्कर, गोल्डन ग्लोब व बाफ्टा पुरस्कार मिळाले आहेत.