मुंबई : श्रीलंकेची गायिका योहानी हीचं 'माणिके मगे हिते' हे गाणं सध्या कमालीचं चर्चेत आहे. प्रत्येक जण या गाण्यावर आपले व्हिडिओ पोस्ट करत आहेत. यात सेलिब्रिटी देखील पाठी नाहीत. योहानीने आपल्या सहकारी गायक-संगीतकार सतीशनसोबत एक गाणे लाँच केले. मानिके मागे हिथे हे गाणं योहानीने 22 मे रोजी यूट्यूब चॅनेलवर लाँच केले. हळूहळू हे गाणे सुपर-डुपर हिट झाले आहे. केवळ श्रीलंकेतच नव्हे, तर भारतासह इतर देशांमध्येही हे गाणं खूप व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे असूनही हे गाणे सिंहली भाषेत आहे आणि बहुतेक लोकांना त्याचा अर्थ समजत नाही. पण योहानीच्या आवाजाची आणि संगीताची जादू अशी आहे की हे गाणे ऐकायला खूप सुखदायक आहे. 28 ऑगस्ट पर्यंत, Manike Mage Hite ला YouTube वर 60 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.



हे गाणे इतके लोकप्रिय झाले आहे की भारतातही सेलेब्स स्वतःचे व्हिडिओ बनवत आहेत आणि ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याचा व्हिडिओ बनवला आणि पोस्ट केला.



म्युझिक कंम्पोझर यशराज मुखाते, ज्यांनी रासोडे में कौन था ? चे प्रसिद्ध मिम तयार केले. त्यांनाही हे गाणे आवडले आणि त्याने स्वतःच्या आवाजात देखील हे गाणं रेकॉर्ड केलं आहे.