भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आज 13 ऑगस्ट रोजी जयंती आहे. श्रीदेवीने वयाच्या चौथ्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली आणि त्यानंतर ती हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री बनली. श्रीदेवी आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत असे. आज अर्थातच ही नायिका आपल्यात नाही पण आपल्या चित्रपटातून ती आपल्या चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त तिची मुलगी आणि अभिनेत्री खुशी कपूरही भावूक झाली आहे. आपल्या दिवंगत आईची आठवण करून, खुशीने तिची बहीण जान्हवी कपूरसोबतचा तिचा बालपणीचा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.


शेअर केली आठवण


https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/khushikapoor.png


अभिनेत्री खुशीने तिच्या घरी एक फ्रेम केलेला फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये दोन्ही कपूर बहिणी त्यांच्या आईसोबत दिसत आहेत. खुशी कपूर अतिशय शांत तर जान्हवी कपूर फोटो क्लिक करताना मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. दोन्ही बहिणींचे आईसोबतचे नाते या फोटोतून अधोरेखित होत आहे. 


बोनी कपूर यांनी व्यक्त केली भावना



बोनी कपूर यांनी पत्नी श्रीदेवीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी एक एडिटेड फोटो शेअर केला आहे. हा फोटो 2012 मध्ये कॉमेडी ड्रामा सिनेमा इंग्लिश विंग्लिशमधील आहे. प्रेमळ पत्नीचा फोटो शेअर करताना बोनी कपूर यांनी एका शब्दात श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी तिला 'जान' असं म्हटलं आहे. 


वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीचं निधन 


वयाच्या 54 व्या वर्षी 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये श्रीदेवीचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला होता. ती तिच्या एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी दुबईत गेली होती. बाथटबमध्ये बुडून अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानंतर बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत श्रीदेवीचा मृत्यू नैसर्गिक नसून अपघाती असल्याचा खुलासा केला होता.