मुंबई : 'सदमा' देऊन गेलेली श्रीदेवी शेवटच्या क्षणी अशी होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवी कायमच आपल्या सौंदर्यामुळे उजवी ठरली आहे. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीचा असा अकालीन मृत्यू हा प्रत्येकालाच चटका लावून जाणार होता अखेरच्या क्षणी चाहत्यांच्या मनात श्रीदेवीची एक सुंदर छबी लक्षात राहावी यासाठी ती कायम ज्या पद्धतीने तयार व्हायची अगदी तशाच पद्धतीने तिला शेवटचा निरोप देताना सजवलं होतं. 



कांजीवरम साडी घालून लाल रंगाची मोठी टिकली लावून, साज शृंगार करून श्रीदेवीला निरोप देण्यात आला. वयाच्या चौथ्या वर्षापासून श्रीदेवी सिनेमांत काम करते. बॉलिवूडप्रमाणेच तामिळ आणि तेलगू सिनेमांत श्रीदेवीने काम केलं आहे. महिला अभिनेत्रींमध्ये सुपरस्टार हा सन्मान श्रीदेवीने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून मिळवला होता. 


फक्त एक कलाकार म्हणून नाही तर एक माणूस म्हणून श्रीदेवीने आपलं वेगळेपण निर्माण केलं होतं. श्रीदेवीने अनेकांना अगदी सहज मदत केली होते. असे असंख्य चाहते आज तिच्या शेवटच्या दर्शनासाठी उपस्थित होते.