सौंदर्याची खाण चाँदणी म्हणजे श्रीदेवी (Sridevi ) या 80-90 दशकातील सर्वात अधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. आज त्या आपल्यामध्ये नाही पण त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना आवडतं. चित्रपटातील अभिनयातून त्यांनी चाहत्यांच्या मनात घर केलंय. श्रीदेवी यांनी दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना दोन मुली आहे, एक जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि दुसरी खुशी कपूर (Khushi Kapoor). पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, श्रीदेवीला तिसरी मुलगी होती. जी पाकिस्तानची असून तिही अभिनेत्री आहे. थांबा गडबडू नका, आम्ही बोलत आहोत श्रीदेवीची पाकिस्तानही ऑनस्क्रीम मुलगी अभिनेत्री सजल अलीबद्दल (sajal ali). श्रीदेवी तिला आपली तिसरी मुलगी मानायची. (Sridevi Pakistani onscreen daughter sajal ali more beautiful than Janhvi and Khushi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवी यांचा 2017 मध्ये 'मॉम' नावाचा क्राइम थ्रिलर चित्रपट तुम्हाला आठवतो. या चित्रपटात श्रीदेवी यांच्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली होती, त्याचबरोबत ऑनस्क्रीन मुलीचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले होते. ज्याची भूमिका पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री सजल अलीने साकारली होती. सजल अली समोर जान्हवी आणि खुशी देखील साधेपणा आणि हलक्याफुलक्याच्या तुलनेत फिक्या दिसतात. 



मात्र, या चित्रपटानंतर पाकिस्तानी स्टार्सवर बंदी आल्याने सजल पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसली नाही, पण तिची फॅन फॉलोइंग काही कमी झाली नाही. आता 7 वर्षांनंतरही हसीना आपल्या स्टाईलने चर्चेत आहे. विशेषत: पारंपारिक कपड्यांमध्ये, तुम्ही देखील त्यांची प्रशंसा करण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखू शकत नाही. सोशल मीडियावर तिचे असंख्य फोटो आणि व्हिडीओच पाहिला मिळतात. 



सजलचे सूट कलेक्शन खूप खास आहे. ज्यामध्ये ती कधी आपल्या साधेपणाने तर कधी भारी लुकने चाहत्यांची मनं जिंकते. मोकळे केस, कमीत कमी मेकअपमध्येही तिचं रुप खुलून दिसतं. मार्डन लूक असो किंवा साडी ती कुठल्याही लूकमध्ये चाहत्यांना घायाळ करते. 




खरं तर तिला कोणते रंग शोभतात आणि कोणते कपडे तिला उठून दिसतात हे सजलला चांगलेच माहीत आहे. तिच्या सौंदर्याने चाहत्यांना वेडी लावलंय.