Khushi Kapoor New Car : बॉलिवूड अभिनेत्री खुशी कपूरचं अभिनय क्षेत्रातील करिअर चांगल्या प्रकारे सुरु असल्याचं म्हणता येईल. रविवारी पापाराझींनी खुशीला चेरी राइड रंगाच्या तिच्या आलिशान गाडीतून जाताना क्लिक केलं. इंटरनेटवर लगेच चर्चा सुरु झाली आहे. तिची गाडी कितीची आहे. तर पापाराझींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे ही चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुशीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. यात खुशी कपूर ही तिच्या नव्या गाडीतून जाताना दिसत आहे. तिनं स्वत: साठी नवीन जी वॅगन खरेदी केली आहे. तुम्ही या गाडीच्या किंमतीचा अंदाज लावू शकता का? चाहत्यांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे की या गाडीची किंमत काय असेल. एका नेटकऱ्यानं मजेशीर कमेंट केली की '100 कोटीं पेक्षा कमी असेल.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'फेरारीच्या तुलनेत जी-क्लास खरेदी करणं हा योग्य निर्णय असतो. 'अनेक लोकांना हा देखील अंदाज बांधला की 'एसयूव्हीची किंमत हे 1-3 कोटींच्यामध्ये आहे. '


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत ही नवी मर्सिडीज बेंज जी 400 डीजेल व्हर्जनची दिसत आहे. ही गाडी या वर्षी जानेवारी महिन्यात लॉंच करण्यात आली होती. एचटी ऑटोनुसार, मर्सिडीज जी 400 डीच्या डिझेल व्हर्जनची किंमत ही 2.55 कोटी आहे. एसयूव्ही 2 व्हेरिएंटमध्ये येते. अ‍ॅडव्हेंचर आणि एएमजी लाइन ट्रिम्स पहिल्यासाठी भारतीय मार्केटसाठी कॉम्फिगर करण्यात आलं होतं. त्यात एक रुफ रॅक, मागे करण्यासाठी असलेली सीट, 18 इंचाची चाकं. एक बाहेरील पॅकेज आणि व्हील ठेवण्यासाठी जागा असे अनेक फीचर्स आहेत. 


हेही वाचा : पति, पत्नी और 'वो'... लग्नाच्या 6 महिन्यात रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीमध्ये 'तिसरं' कोण


खूशी ही श्रीदेवी आणि बोनी कपूरची लेक आहे. खूशी ही तिच्या आई आणि बहिणीप्रमाणे अभिनेत्री झाली. तिनं जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. खुशी लवकरच 'लव टुडे' च्या हिंदी रीमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आमिर खानचा मुलगा आणि महाराजा स्टार जुनैद खान दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात त्या दोघांसोबत सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम अली खान देखील दिसणार आहे. एकाच चित्रपटात तीन स्टारकिड्स दिसणार असल्यानं सगळ्यांना उत्सुकता आहे.