श्रीदेवी-मिथुन एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करायचे पण.., अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, `माधुरी..`
Sridevi Break Up With Mithun Chakraborty: श्रीदेवी सेटवर कसं वागायच्या याबद्दल त्यांच्यासोबत काम केलेल्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितलं आहे.
Sridevi Break Up With Mithun Chakraborty: 'प्रतिघात', 'यतीम', 'गुन्हा' यासारख्या चित्रपटांबरोबरच अनेक गुजराती चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुजाता मेहता यांनी एक मोठा खुलासा केला आहे. 90 च्या दशकामधील 'श्रीकांत', 'ये मेरी लाईफ है', 'यस सर'सारख्या मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलेल्या या अभिनेत्रीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने काही बड्या नावांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल भाष्य केलं. अभिनेत्री श्रीदेवीबरोबर काम करण्याचे अनुभव सुजाता यांनी सांगितले. तसेच श्रीदेवीबरोबर काम केल्याने ती फार उद्धट असल्याचं समज दूर झाल्याचंही सुजाता म्हणाल्या. त्यांनी यावेळी श्रीदेवी आणि माधुरी दिक्षितमधील कथित स्पर्धेबद्दलही भाष्य केलं.
फारच विनम्र
सुजाता यांनी 'हिंदी ऋष'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, श्रीदेवी फारच विनम्र होत्या असं म्हटलं आहे. एकदा त्यांनी त्यांचा भाचीला खुर्चीवरुन ठवून आपल्याला जागा दिल्याचं सुजाता म्हणाल्या. श्रीदेवी यांनी कायमच मला मान-सन्मान दिला असंही सुजाता म्हणाल्या. श्रीदेवी या उद्धट नव्हत्या. त्यांना फार लोकांबरोबर बोलायला आवडायचं नाही. तसेच मिथुन चक्रवर्तीबरोबर झालेल्या ब्रेकअपमुळे त्या व्यथित होत्या, असं सुजाता यांनी म्हटलं आहे.
वेड्यासारखे एकमेकांच्या प्रेमात
"त्या फार दुःखी आणि निराश असायच्या. मात्र त्या कामाबद्दल फार प्रोफेश्नलपणे वागायच्या. कॅमेरा सुरु होताच त्या केवळ कॅमेराच्या असायच्या. मात्र शूट थांबताच त्या एका कोपऱ्यात शांतपणे बसायच्या. ते दोघे (श्रीदेवी, मिथुन) दोघे एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करत होते," असा दावा सुजाता यांनी केला आहे. पुढे काही कारणांनी या दोघांचं ब्रेअप झाल्याने श्रीदेवी उदासच राहायच्या असंही सुजाता म्हणाल्या. श्रीदेवी आणि मिथुन हे केवळ रिलेशनमध्ये होते असं नाही तर ते दोघे एकमेकांना डेटही करत होते. काही दाव्यानुसार तर श्रीदेवी आणि मिथूनने लपून छपून लग्नही केलं होतं.
श्रीदेवी आणि माधुरी वादावरही बोलल्या
सुजाता यांनी पुढे बोलताना श्रीदेवी आणि माधुरीमधील स्पर्धेबद्दल भाष्य केलं. "त्या सेटवर एकमेकींपासून दूर बसायच्या. माधुरी कोणाबरोबरच बोलत नसे. ती एका कोपऱ्यात वॉकमन लावून बसायची," असं सुजाता यांनी सांगितलं. सुजाता यांनी रजनीकांत यांच्याबरोबर 1987 साली प्रदर्शित झालेल्या 'जमीन' चित्रपटातही काम केलं आहे. रजनीकांत हे फार साधे आणि सामान्य व्यक्तीमत्व असल्याचं सुजाता यांनी सांगितलं. "पारंपारिक हिरोप्रमाणे त्यांचा लूक नव्हता, मात्र ते सुपरस्टार होते. तुम्ही हे सारं कसं करता असं मी त्यांना विचारलं. त्यावर त्यांनी, "मी रात्रभर आरशासमोर बसून रहायचो आणि स्वत:मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करायचो," असं उत्तर दिलेलं. ते कधीतरी दुपारचं जेवण न घेता केवळ ताक प्यायचे. त्यांना अजिबात ईगो नसून ते फार साधे आहेत," असं सुजाता यांनी म्हटलं.