Janhvi Kapoor Talked About Public Place Romance : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही लोकप्रिय अभिनत्रींपैकी एक आहे. जान्हवीनं फार कमी कालावधीत सगळ्यांची मने जिंकली. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. जान्हवी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. जान्हवी आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवी सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिला तिच्या खासगी आयुष्याविषयी विचारण्यात आले आहे. खरंतर जेव्हा जान्हवीला विचारण्यात आलं की तुला संधी मिळाली तर तू कोणत्या कलाकाराला गिफ्ट देशील. तेव्हा जान्हवी म्हणाली, 'मला सारा अली खानला गिफ्ट द्यायला आवडेल आणि मी तिला एक अॅडव्हेंचर ट्रिप देईल जी केदारनाथ किंवा लेह- लडाख असू शकते.' यानंतर जान्हवी प्रियांका चोप्राचे नाव घेते आणि बोलते की प्रियांकाला घरी जेवायला बोलवेन. 



जान्हवीला विचारण्यात आलं की, ती फक्त पैशांसाठी चित्रपट करते का, यावर जान्हवीनं नाही असे उत्तर दिले. जान्हवीला पुढे विचारलं की तिने कोणत्या सार्वजनिक ठिकाणी रोमान्स केला आहे का? त्यावर जान्हवी लाजत हसली आणि हो असं म्हणाली. तर जान्हवी पुढे सांगते की पापाराझींपासून स्वत: ला वाचवण्यासाठी जान्हवी गाडीच्या डिक्कीत लपली आहे. सध्या जान्हवीचं नाव पुन्हा एकदा तिच्या एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियाशी जोडण्यात येत आहे. 


हेही वाचा : Sonam Kapoor नं मुलगा वायूसाठी घेतला हा मोठा निर्णय, पापाराझींना बसला धक्का


दरम्यान, जान्हवीनं काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की तिची आई श्रीदेवीनं (Sridevi) तिच्या बाथरुमचे लॉक काढले होते आणि आता घराचे रेनोव्हेशन केले तरी सुद्धा जान्हवीच्या बाथरुममध्ये लॉक नाही. वोगनं इंडियानं त्यांच्या यूट्यूब अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये जान्हवीचे चेन्नईतील घर दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये जान्हवीचे घर आतून कसे दिसते ते पाहायला मिळत आहे. व्हिडीओत घरातल्या प्रत्येक गोष्टीविषयी जान्हवी सांगते. 'हे घर तिची आई श्रीदेवीने विकत घेतलं होतं, तिच्या आईनं घेतलेली पहिली प्रॉपर्टी म्हणजे हे घर आहे.' व्हिडिओमध्ये जान्हवी श्रीदेवी यांनी काढलेले पेंटिंग देखील दाखवते.


पुढे जान्हवी म्हणाली, 'माझ्या बेडरुममधील बाथरुमला अजून लॉक नाही, कारण आई मला कधीच बाथरुमचं दार बंद करुन द्यायची नाही. मी बाथरुममध्ये जाऊन मुलांसोबत बोलेन अशी तिला भीती वाटायची. बंगल्यातील माझ्या रुममध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. परंतु, अजूनही रुममधील बाथरुमला लॉक लावलेलं नाही.'