हिरव्या फ्रॉकमध्ये सुहाना खानने स्टेजवर केलेली `ती` कृती चर्चेत; अनेकांनी केलं ट्रोल
SRK Daughter Suhana Khan Trolled: शाहरुख खानची मुलगी सुहाना ही एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. आपल्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी संपूर्ण स्टारकास्ट या कार्यक्रमाला आलेली.
SRK Daughter Suhana Khan Trolled: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान ही लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. सुहाना खानने अभिनय केलेल्या 'द आर्चीज' चित्रपट 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुहानाबरोबरच सर्व कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन इव्हेंटमध्ये सहभागी होत आहेत. अशाच एका कार्यक्रमामध्ये सुहानाने केलेल्या एका कृत्यामुळे ती ट्रोल होत आहे.
नेमकं घडलं काय?
झालं असं की, एका ठिकाणी प्रमोशनसाठी गेलेल्या सुहानाला हुला हूप करण्याचं चॅलेंज करण्यात आलं. सुहाना यासाठी तयारही झाली. मात्र तिला हुला हूपमध्ये फारसं यश आलं नाही. सुहानाने जास्तीत जास्त वेळ रिंग फिरवण्याचा प्रयत्न केला. आपल्या या प्रयत्नामधून तिने उपस्थित चाहत्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. पण यात ती अपयशी ठरली. सुहानाचा हुला हूपवर हात आजमावण्याचा प्रयत्न करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला ट्रोल केलं जात आहे.
तिला किती पॉइण्ट्स द्याल?
व्हिडीओमध्ये सुहाना हिरव्या रंगाच्या फ्रॉकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. सुहाना स्टेजवरच एक रिंग घेऊन हुला हूप करण्याचा प्रयत्न करते. मात्र अवघ्या काही सेकंदांमध्ये ही रिंग खाली पडते. 'फिल्मीग्यान'ने हा व्हिडीओ शेअर करताना सुहानाच्या हुला हूपला किती पॉइण्ट्स द्याल असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
अनेकांनी घराणेशाहीवरुन साधला निशाणा
या व्हिडीओमध्ये सुहानाने केलेले प्रयत्न अनेकांना फारच कमी वाटले. बऱ्याच लोकांनी सुहानावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला. अनेकांनी कमेंट करुन सुहानामध्ये फारसं कौशल्य नसल्याचं म्हणत तिला सुनावलं आहे. सुहानामध्ये कोणत्याच प्रकारचं टॅलेंट नाही असा टोला एकाने लगावला आहे. तर अन्य एकाने ही कोणत्याच गोष्टींमध्ये चांगली नाही, असा शाब्दिक चिमटा काढला आहे. टॅलेंटच्याबाबतीत सुहाना झिरो असल्याचा टोला अन्य एकाने लगावला आहे. माझ्या मनात सुहानाबद्दल कोणताही द्वेष नाही पण स्टार किड्सचं आयुष्य फारच सोप असतं. बाहेरुन येणारे अधिक प्रतिभासाली आणि सुंदर दिसणाऱ्या लोकांना म्हणाव्या तशा संधी मिळत नाहीत, असं एका तरुणाने म्हटलंय.
हुपा हूला ट्राय करतानाच्या सुहानाच्या या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज आहे.