मुंबई : चित्रपट रसिकांना कमालीची उत्सुकता लागून राहिलेल्या 'आरआरआर' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि आलिया भट्ट हे काही ओळखीचे चेहरे यामध्ये दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाचं दिग्दर्शन राजामौली यांनी केल्यामुळं अर्थातच चाहत्यांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. या अपेक्षा ट्रेलर पूर्ण करत आहे. 


जबरदस्त थरार, कलाकारांचा दमदार अभिनय आणि अर्थातच राजामौली टच या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 


मैत्री, विश्वासघात आणि देशप्रेम असे विविध घटक या ट्रेलरच्या माध्यमातून पाहता येत आहेत. 


ट्रेलर पाहताना ब्रिटीशांच्या जुलमी राजवट काळातील  कथानक असल्याचं स्पष्ट होत आहे. कलाकारांचे अभिनय इथं विशेष लक्ष वेधत आहेत. 


'बाहुबली'ला जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या राजामौली यांनी RRR साकारण्यातही कोणतीच जागा रिक्त सोडली नाही. हेच व्हिडीओतून पाहता येत आहे. 



7 जानेवारी 2022 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. फक्त अॅक्शन आणि ड्रामाच नव्हे तर चित्रपटाचे संवादही त्याच तोडीचे आहेत. 


आलिया भट्टनं हिंदी चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याचप्रमाणे आता तिनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केलं आहे. थेट राजामौलींच्याच चित्रपटातून तिला संधी मिळाल्यामुळं आलिया आता दक्षिणेकडच्या चाहत्यांना नेमकी कशी गारद करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.