मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोणची चौकशी सुरू आहे. आज सकाळी दीपिका पदुकोण एनसीबीच्या कार्यालयात हजर झाली आहे. दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशसोबतंच तिच ड्रग्स चॅट समोर आलं आहे. ज्यानंतर दीपिकाला NCB कडून समन पाठवण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं सांगितलं जातंय की, केपीएस महलोत्रा आणि तिच्या टीमच्या अधिकाऱ्यांसोबत एनसीबीची एक महिला ऑफिसर देखील दीपिकाच्या इंटोरोगेशन रुममध्ये उपस्थित असणार आहे. दीपिकाचा मोबाइल फोन देखील एनसीबीने वेगळा ठेवला आहे. करिश्मा, जया आणि दीपिका यांच्यातील ड्रग्स संदर्भातील चॅटवर आज थेट प्रश्न विचारले जाणार आहेत.


दीपिका एनसीबीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश देखील पोहोचली आहे. करिश्माची शुक्रवारी देखील एनसीबीने चौकशी केली. आता पुन्हा दीपिका समोर बसवून तिची चौकशी केली जाणार आहे. 
अभिनेत्री सारा अली खानला देखील चौकशीसाठी उपस्थित व्हायचं होतं. पण एनसीबीच्या ऑफिसमध्ये येण्यासाठी तिने थोडा वेळ मागितला आहे. सारा अली खान दुपारी १२.३० वाजेपर्यंत एनसीबीच्या कार्यालयात दाखल होऊ शकते. 


दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्यामध्ये जे चॅट झाले. त्यामुळे चांगलीचं खळबळ माजली आहे. शिवाय यामुळे दीपिकाच्या अडचणींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तिची मॅनेजर करिश्माने चॅट संबंधी महत्त्वाचे खुलासे एनसीबी चौकशी दरम्यान केले. 

गेल्या ६ तासांपासून एनसीबी करिश्माची चौकशी करत आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार करिश्माने त्या व्हाट्सऍप ग्रुप प्रकरणी एनसीबीला सांगितले आहे. या ग्रुपमध्ये फक्त तीन जणांचा समावेश होता. ज्यांचे नाव जया, करिश्मा आणि दीपिका असं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रुपची ऍडमीन दीपिका होती. या ग्रुपमध्ये मुख्यतः ड्रग्सवरून चॅट होत असे. 


साला अली खान आणि श्रद्धा कपूर दोघेही एनसीबीच्या चौकशी अगोदर आपल्या वकिलांशी चर्चा करत आहेत. यामुळे दोघींनी एनसीबीकडून वेळ घेतला आहे. एनसीबीने दोघांनाही परवानगी दिली आहे. सारा अली खान आपली आई अमृता सिंह सोबत लीगल टीमकडून व्हिडिओ कॉन्फेंसिंगमार्फत सल्ले घेत आहे.