मुंबई : सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात ईडीच्या चौकशीत अशी माहिती समोर आली आहे की, सुशांत मालाड येथील एका ४.५ करोड रुपयाच्या फ्लॅटचा EMI स्वतः भरत होता. तो फ्लॅट तोच राहात आहे ज्यामध्ये अंकिता लोखंडे राहत आहे. अंकिता सुशांत सिंहची एक्स गर्लफ्रेंड आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिया चक्रवर्तीच्या चौकशी दरम्यान या फ्लॅटचा उल्लेख झाला होता. सुशांतच्या मनात असूनही तो अंकिताला हे घर खाली कर असं सांगू शकत नव्हता. महत्वाची बाब म्हणजे अंकिताच्या या घराचं EMI सुशांत भरत होता. आतापर्यंत सुशांतने या घराकरता किती रक्कम दिली आहे. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण आता या घराचे फक्त काहीच EMI भरायचे राहिलेले आहेत. 


सुशांतच्या अकाऊंटमधून दर महिन्याला या फ्लॅटच्या EMI ची रक्कम जात असल्याची नोंद बँकेच्या बुकावर होत आहे. अंकिताने सुशांतच्या प्रकरणाच्या चौकशीकरता अनेकदा CBI चौकशीची मागणी केली होती. ईडी आता तपास करत आहे की, सुशांतच्या अकाऊंटमधून रिया काय फेरबदल करत होता. 



या फ्लॅटच्या खरेदीपासून आतापर्यंतच्या EMI बाबत सर्व माहिती अंकिता लोखंडेने ट्विटरवर शेअर केली आहे. तिने यामध्ये बँकेचे स्टेटमेंट शेअर केली असून मी यापेक्षा जास्त काहीच बोलू शकत नाही असं सांगितलं आहे. 





सुशांतच्या आत्महत्येला दोन महिने झाले आहेत. अद्याप या प्रकरणाची घडी उघडलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची CBI चौकशी करावी अशी मागणी सगळ्याच स्तरावरून होत आहे.