नवी दिल्ली : क्राइम शोचा विषय निघतो तेव्हा 'सावधान इंडिया' शो चे नाव टॉपमध्ये असते. पण हा लोकप्रीय ठरलेला कार्यक्रम रातोरात ऑफ एयर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा खऱ्या मानल्या तर 'स्टार भारत' ने शोच्या निर्मात्यांना याची शुटींग थांबविण्याचे आदेश दिले आहेत.


८ वेगवेगळे प्रोडक्शन हाऊस हा शो चालवत होते. पण अचानक शो बंद होणार असल्याने क्रू मेंबर्स आणि कलाकारांना मोठा धक्का बसलायं. 


अभिनेता सुशांत सिंह सध्या हा कार्यक्रम होस्ट करतोय. याआधी मोहनीश बहल, सिद्धार्थ शुक्ला, हितेन तेजवानी, पूजा गौर, शिवानी तोमर आणि दिव्या दत्ता यांनी होस्ट केलायं. 


कार्यक्रम बंद 


 गेल्यावर्षी 'लाइफ ओके' चॅनलला 'स्टार भारत' नावाने रिलॉन्च करण्यात आलं. रिलॉन्च नंतर नव्या चॅनलवर सर्व नवे शो होते. पण हा लोकप्रिय कार्यक्रम नेहमी दाखविला जात असे. पण माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार हा कार्यक्रम दाखविला जाणार नाही.


पॉलिसी बदलली


 चॅनलने आपल्या नव्या पॉलीसीनुसार हा निर्णय घेतलाय. यानुसार शहासोबत ग्रामीण भागांना जोडणाऱ्या कार्यक्रमांना पसंती देण्यात येत आहे. 


खराब कमेंट्स  


 प्रेक्षकांकडून येणाऱ्या खराब कमेंट्समुळे 'सावधान इंडिया' थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. क्राइम स्टोरी सादर करण्याच्या पद्धतीमुळे चॅनलला नावं ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.