नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून दिवाळीचे जोरदार सेलिब्रेशन चालू आहे. अनेक सेलिब्रिटींकडे दिवाळीची जंगी पार्टी देखील आयोजित केली होती. आमिर खान, एकता कपूर, संजय दत्त, अनिल कपूर आणि जावेद अख्तर यांसारख्या सेलिब्रिटींनी घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. मात्र सेलिब्रिटींबरोबर स्टार किड्सने देखील दिवाळी मस्त साजरी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तैमूरचा खास फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात तैमूर आपल्या वडिलांसोबत म्हणजेच सैफ अली खानसोबत दिसत आहे. यात दोघांचे कपडे सारखेच दिसत आहेत. 


शाहिदने तिच्या छोट्या परीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 



श्रीदेवीच्या दोन्ही मुली यंदाच्या दिवाळी अत्यंत ग्लॅमरस दिसत होत्या. श्रीदेवी आपले पती आणि दोन्ही मुलींसह आमिर खानच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाल्या होत्या. यात तिच्या दोन्ही मुली ख़ुशी आणि जाह्नवी मनीष मल्होत्रा याने डिजाईन केलेल्या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत होत्या. 




दिवाळीनिमित्त काजोल आणि अजय आपल्या दोन्ही मुलांसह कॅमेऱ्यात पोज देताना दिसले. यात सगळे पारंपरिक पोशाखात खुलून दिसत होते. 



दिवाळी पार्टीत चंकी पांडेची मुलगी अनन्या देखील सुंदर दिसत होती. तिने देखील मनीष मल्होत्रा याने डिजाईन केलेला ड्रेस घातला होता. अनन्याचा हा फोटो चंकी पांडेच्या पत्नी भावना यांनी शेअर केला.