मुंबई : मालिका विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना Coronavirus व्हायरसविषयी गैरसमज आणि अफवा पसरवणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. असं करत असताना तिने स्वत:च्याच भावाचंही उदाहरण दिलं आहे. सध्याच्या आव्हानात्मक प्रसंगी आपल्या कुटुंबातीलच व्यक्ती कशा प्रकारे जबाबदारीने वागत आहेत हे तिनं सर्वांसमोर आणलं आहे. पण, या साऱ्यामागे एक कारणही असल्याचं तिची पोस्ट वाचून लक्षात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीत कार्यरत असणाऱ्या अनेकांकडेच सध्या कोरोना संशयितांच्या दृष्टीने पाहण्यात येत आहे. पण, हे पूर्णपणे चुकीचं असून, आपला भाऊसुद्धा वैमानिक आहे. पण, तो कोरोना पॉझिटीव्ह नाही. उलटपक्षी त्याने स्वत:हून अतिशय जबाबदारपणे काही दिवस विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला असल्याची अतिशय महत्त्वाची बाब तिने सर्वांसमोर मांडली. 


काही दिवसांपूर्वीच एका विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीत कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला आणि तिच्या आईला शेजाऱ्यांकडून बरीच अपमानास्पद वागणूक मिळाली होती. त्याच महिला कर्मचाऱ्याचा व्हिडिओ शेअर करत दिव्यांकाने कोरोनाच्या मुद्द्यावरुन अफवा पसरवणाऱ्यांना किमान आता तरी हे सर्व बंद करा असं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. 


एकमेकांमध्ये अंतर राखा, पण सर्वप्रथम आपण मानवता अजिबातच विसरु नका असा संदेश तिने दिला. 'माझा भाऊ वैमानिक आहे. अतिशय जबाबदारीने तो विलगीकरणार आहे.  कोणतीही चिन्हं नसतानाही. आणि जर तो कोरोना पॉझिटीव्ह असता तर, इतरांप्रमाणेच त्यानेसुद्धा यावर उपचार घेतलेच असते', असं तिने लिहिलं. आपल्या भोपाळच्या घराबाहेर अधिकाऱ्यांना यासंबंधीचा एक शिक्का लावल. अर्थात ते गरजेचं होतं. पण, यावेळी ते भावाला कोरोना झाला नसल्याचं नमूद न करताच गेले. सध्याच्या घडीला विमानसेवांमध्ये काम करणाऱ्यांच्या कुटुंबांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागत असेल याविषयी दिव्यांकाने चिंता व्यक्त केली. 



 


कोरोनाशी लढा देत असतेवेळी कित्येकजण त्यांचे प्राण पणाला लावून रुग्णांची शक्य त्या सर्व परिंनी सेवा करत आहेत. हे स्पष्ट करतेवेळी तिने आपल्या वडिलांचं आणि भावाचं उदाहरण दिलं. सध्याच्या घडीला हरवत चाललेली माणुसकी आणि अफवांचा उठणारा बाजार पाहता परिस्थिती किती चिंताजनक आहे हेच तिच्या या पोस्टमधून सर्वांपर्यंत पोहोचलं.