सुब्रमण्यम स्वामींनी सुशांतच्या एम्स पोस्टमोर्टम रिपोर्टबाबत केलं मोठं वक्तव्य
काय म्हणाले भाजप नेता
मुंबई : भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांत आत्महत्या प्रकरणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सुशांतच्या एम्समधील पोस्टमार्टम रिपोर्टवरून ही आत्महत्या होती की हत्या? हे कळू शकत नाही. कारण त्याठिकाणी सुशांतचा मृतदेहच नव्हता. काही पोलीस अधिकारी मीडियाला माहिती देतात की, एम्सच्या रिपोर्टवरून कळेल की ही हत्या आहे की आत्महत्या.
कसा होणार हा निर्णय
सुब्रमण्यम स्वामींनी ट्विट करून म्हटलंय की, काही पोलीस अधिकारी मीडियाला सुशांत प्रकरणाबद्दल सांगत होते. एम्सच्या रिपोर्टवरून कळेल की सुशांतने आत्महत्या केली की हत्या. हे ते कसं करू शकतात. जेव्हा त्यांच्याकडे सुनंदा केस प्रमाणे सुशांतचा मृतदेहच नसेल तर. एम्सचे रिपोर्ट हे सांगू शकतात की, डॉक्टरांनी नेमकं काय केलं आणि काय नाही.
महेश भट्टवर साधला निशाणा
या अगोदरर फिल्ममेकर महेश भट्ट यांच्यावर सुब्रमण्यम स्वामींनी निशाणा साधला होता. त्यांनी विचारलं होतं की, तुम्ही आपला धर्म इस्लाममध्ये परावर्तित केला आहे.