Suchitra Krishnamoorthi : बॉलिवूडमधील कलाकार हे त्यांच्या बिनधास्त लाइफस्टाईलसाठी ओळखले जातात. एकत्र काम केल्यानंतर हे कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात. इतकंच नाही तर पुढे जाणून ते लग्न बंधनात अडकतात. असंच काहीसं गायिका आणि अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ति आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासोबत झाले. सुचित्रा कृष्णमूर्तिन आणि शेखर यांच्यात तब्बल 30 वर्षांचा फरक आहे. त्याचं लग्न हे 12 वर्षे टिकलं. 1999 साली लग्न बंधनात अडकलेल्या सुचित्रा आणि शेखर हे 2007 साली विभक्त झाले. तर ते दोघं 2020 साली संपत्तीवरून झालेल्या वादामुळे चर्चेत आले होते. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुचित्रानं तिच्या आणि शेखर यांच्या  वैवाहिक आयुष्यातील काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुचित्रा ही वयाच्या 19 व्या वर्षी शेखर यांना भेटली होती. तर वयाच्या 22 व्या वर्षी तिनं 30 वर्षांनी मोठ्या असलेल्या शेखर यांच्याशी लग्न केलं. सुत्रिचा म्हणाली, "माझ्या पतीची इच्छा नव्हती की मी अभिनय करायला हवा. शेखरने अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी अभिनय करायचा नाही. मी भोळी होते. त्यामुळे ही मोठी गोष्ट नाही, असा विचार करून मी त्याचं म्हणणं ऐकलं. कारण मी एका नॉन फिल्मी कुटुंबातून होते. जेव्हा मी शाळेत आणि कॉलेजमध्ये होते तेव्हा मला चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या होत्या. कॉलेजमध्ये असताना कधी हो कधी नाही बोलण्याच्या ऑफर देखील मिळाल्या होत्या. जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा मी एक मल्याळम चित्रपट केला होता. माझे आई-वडील खूप स्ट्रिक्ट होते. मी अभिनय करावा असं त्यांना मुळीच वाटत नव्हतं. पण मी त्यांना खोटं बोलून चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोची गेले. त्यानंतर मी केलेले चित्रपट सुपरहिट ठरले."



पुढे सुचित्रा म्हणाली की "तेव्हा माझ्या नवऱ्याचं म्हणणं होतं की त्याच्या पत्नीनं अभिनय करू नये अशीच त्यांची इच्छा आहे. त्यावेळी मला कळत नव्हतं. माझ्यात महत्त्वाकांक्षे पेक्षा जास्त प्रतिभा होती. त्यामुळे मला कधी वाटलं नव्हतं की कधी काही माझ्यासाठी थांबेल. पण असं झालं."


हेही वाचा : वाढते दर पाहता 15 दिवसात टॉमेटो येण्याची राखीनं सांगितली टेक्निक, म्हणाली...


आई-वडील लग्नाच्या विरोध असल्याचे म्हणतं सुचित्रा म्हणाली, "माझे आई-वडील आमच्या लग्नाच्या विरोधात होते. कारण शेखर त्यावेळी माझ्या आईच्या वयाचा होता आणि त्यातही तो घटस्फोटीत होता. माझी आई माझे पाय पडत होती की मी त्याच्याशी लग्न करायला नको, ती विनंती करत होती. तिनं मला अफेअर करून त्याला माझ्या डोक्यातून काढून टाकण्याचा सल्ला दिला. पण मला खात्री होती की मला हेच हवं आहे. त्यामुळे मी तिचं ऐकलं नव्हतं."