सुधा चंद्रन यांनी सांगितली इंडस्ट्रीची अवस्था, म्हणाल्या, ३५ वर्षे काम करूनही मला...
धा चंद्रन हे केवळ टेलिव्हिजनच नाही तर चित्रपटसृष्टीतही प्रसिद्ध नाव आहे.
मुंबई : सुधा चंद्रन हे केवळ टेलिव्हिजनच नाही तर चित्रपटसृष्टीतही प्रसिद्ध नाव आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसलेल्या या अभिनेत्रीने 1985 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचं नाव आहे 'मयुरी'. त्यांनी इंडस्ट्रीत ३५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्या आजही इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. पण अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना सुधा चंद्रन यांनी इंडस्ट्रीची स्थिती सांगितली.
सुधा चंद्रन यांनी या मुलाखतीत सांगितलं की, 35 वर्षे काम केल्यानंतरही कधी-कधी त्यांच्याकडून ऑडिशन्सची मागणी केली जाते. आणि त्यांना ते अजिबात आवडत नाही. सुधा चंद्रन म्हणाल्या ''मला जेव्हा ऑडिशन द्यायला सांगितलं दातं तेव्हा मी अगदी उघडपणे त्यांना सांगते, मी ऑडिशन देणार नाही. जर मला ऑडिशन द्यायचं असेल तर या इंडस्ट्रीमध्ये माझं 35 वर्षांचं योगदान काय कामाचं आहे. आणि जर तुम्हाला माझं काम माहित नसेल तर मला तुमच्यासोबत काम करायचं नाही.''
लूक टेस्टची होते डिमांड
''केवळ ऑडिशनच नाही तर कधीकधी लूक टेस्टचीही मागणी केली जाते. काही लोकं म्हणतात एक काम करा ना, जरा लुक टेस्ट देऊ शकता का? यावर मी सरळ त्यांना सांगते तू माझा चेहरा पाहिलास ना. त्याचबरोबर सुधा चंद्रन यांनी सांगितले की, याचबरोबर त्यांच्या मते, इंडस्ट्रीत ३०-३५ वर्षे घालवलेल्या कलाकारांना अशी वागणूक देऊन त्यांना अपमानित करु नये.''
नागिन 6 मध्ये सुधा चंद्रन दिसत आहे
सुधा चंद्रन नागिन मालिकेचा भाग आहेत. आणि आता त्या नागिन 6 शी देखील जोडल्या गेल्या आहेत. या शोमध्ये त्यांना खूप पसंत केलं जात आहे. या शो शिवाय त्या झी तेलुगूच्या प्रोजेक्टशीही जोडल्या गेल्या आहेत. सुधा चंद्रन एका क्राइम सीरिजचं सूत्रसंचालनही करत आहेत.