मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या फोटोजमुळे नेहमी चर्चेत राहते. स्टार किड्समध्ये बहुचर्चित असलेल्या सुहानाचे फोटोज सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. सुहानाने बॉलिवूडमध्ये पर्दापण केलेले नसले तरी तिचा चाहतावर्ग मोठा आहे. काही दिवसांपूर्वी गौरी खानने आपल्या लाडक्या लेकीचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केला. हा फोटो आता जबरदस्त व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरीने हा फोटो शेअर करत लिहीले की, आता शाळेला बाय म्हणण्याची वेळ आली आहे. यावरुन सुहानाचा हा फोटो फेअरवेल पार्टीतील असावा, असे वाटते. या फोटोत सुहाना अतिशय सुंदर दिसत आहे. सिलव्हर रंगाची मिनी, स्मोकी आईज आणि मोकळे केस यात सुहाना अप्रतिम दिसत आहे. लंडनची बेस्ट स्टायलिस्ट गायत्री धवनने सुहानाला हा लूक दिला आहे.



सुहाना आपल्या वडीलांप्रमाणेच सिनेसृष्टीत करिअर करु इच्छिते. यापूर्वी एका मुलाखतीत शाहरुखने सांगितले होते की, सुहाना सिनेसृष्टीत येऊ इच्छिते. पण त्यापूर्वी तिला तिचे शिक्षण पूर्ण करावे लागेल. तर गौरी खानने एका मुलाखतीत सांगितले की, सुहाना लवकरच मॅगझीनच्या कव्हरपेजवर दिसेल आणि या प्रोजेस्टसाठी सुहाना अतिशय उत्सुक आहे. पण हा प्रोजेक्ट कधी पूर्ण होणार याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.