वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर सुहाना खान रूपेरी पडद्यावर; `तुझ्या वयाची मुलं...` म्हणत नेटकऱ्यांनी हिणवलं
The Archies Release Date: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सुहाना खान हिची. यावेळी तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तिचा नवा चित्रपट हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यावेळी तिच्या चित्रपटाची रिलिज डेट प्रदर्शित झाली आहे.
The Archies Release Date: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सुहाना खान हिची. सुहाना खान ही आपला लाडका सुपरहिरो शाहरूख खान याची कन्या आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी सुहाना खान ही चर्चेत आहे ती म्हणजे तिच्या आगामी चित्रपटाच्या रिलिजमुळे. तिचा पहिला वहिला चित्रपट हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागच्या वर्षी या चित्रपटाची घोषणा झाली आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता.
त्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. आता अखेर हा चित्रपट कधी प्रदर्शित होतोय याची उत्सुकता असताच यावेळी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु यावेळी मात्र प्रेक्षक तितकेच उत्सुक नसल्याचे दिसून येते आहे. यावेळी सुहाना आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी उत्सुक असली तरीसुद्धा नेटकऱ्यांच्या कमेंट्स पाहून तुम्हाला कळेल की प्रेक्षक फार काही उत्सुक नाही आणि सोबतच त्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे.
यावेली सुहानानं कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ''आता फक्त 100 दिवस बाकी आहे. 7 डिसेंबर रोजी The Archies हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.'' अनेकांनी तिला तिच्या या नव्या चित्रपटाच्या घोषणेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. परंतु काहींनी मात्र फारच उदासीनता दाखवली आहे. काहींनी म्हटलंय की, आम्ही अजिबातच उत्सुक नाही. तर एकानं म्हटलं की, ''सुहानाच पहिला चित्रपट हा आताच प्रदर्शित होतो आहे त्यातून तिच्या वयाची मुलं तर फार मोठी झाली आहेत.'' तर अनेकांनी लिहिलंय की, ''इतक्या उशिरा हा चित्रपट का प्रदर्शित होतो आहे?''
हेही वाचा : सुपरस्टार अभिनेत्रीनं लावला बहिणीसाठी वशिला; नेटकऱ्यांचा जळफळाट, म्हणाले, 'नेपोटिझम डोक्यावर बसणार'
सुहाना खानसोबत या चित्रपटातून दोन बडे स्टारकीड्सही एन्ट्री करणार आहेत. त्यामुळे त्यांची विशेष करून चर्चा रंगलेली आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर देखील या चित्रपटातून पदार्पण करणार आहेत. त्यामुळे जेव्हा या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला तेव्हा यावेळी मल्टिवर्स ऑफ नेपोटिझम अशी यावर टीका होऊ लागली होती. आता अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.