व्हिडिओ : `सुई धागा`च्या `चाव`मध्ये वरुण - अनुष्काचा रोमान्टिक अंदाज
पेपॉन आणि रोनिकी गुप्ता यांनी या गाण्याला आपला आवाज दिलाय
मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा याचा 'सुई धागा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सोमवारी या सिनेमाचं पहिलं गाणं 'चाव लागा'देखील प्रदर्शित करण्यात आलंय. तीन मिनिटांच्या या गाण्यात मौजी (वरुण धवन) आणि ममता (अनुष्का शर्मा) यांच्यातल्या विश्वास आणि प्रेमाची कहाणी दर्शवण्यात आलीय.
हे गाणं वरुण ग्रोवरनं लिहिलंय तर हे गाणं कम्पोज केलंय अनु मलिक यांनी... पेपॉन आणि रोनिकी गुप्ता यांनी या गाण्याला आपला आवाज दिलाय.
'सुई धागा' हा सिनेमा येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.