मुंबई : बॉलिवूडमध्ये सुरांची मलिका ओळखली जाणारी गायिका सुनीधि चौहानचा आज वाढदिवस आहे. सुनीधिचा जन्म 14 ऑगस्ट 1983 मध्ये झाला आहे. बॉलिवूडमधील अनेक सदाबहार गाणी आपल्या आवाजाने गायली आहेत. सुनीधिने अगदी कमी वयातच गाणं गायला सुरूवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूरदर्शनवर येणाऱ्या 'मेरी आवाज सुनो' या कार्यक्रमातून सुनीधि चौहानला ओळख मिळाली. सुनीधि हा शो जिंकली होती. 12 वर्षाची असताना 'शास्त्र' या सिनेमात गाणं गायलं आहे. यानंतर 1999 मध्ये "रूकी रूकी सी जिंदगी' या गाण्यामुळे सुनीधि लोकप्रिय झाली. या गाण्यासाठी 16 वर्षाची असताना सुनीधिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. सुनीधिने 18 वर्षाची असताना 14 वर्षाहून मोठा असलेल्या कोरिओग्राफर बॉबी खानसोबत लग्न केलं. सुनीधिच्या या निर्णयामुळे तिच्या घरातले नाराज होते. मात्र तिच्यावर प्रेमाच गारूड होतं. लग्नानंतर कुटुंबियांनी सुनीधिशी नात तोडलं. सुनीधि आणि बॉबी यांच्यात काही दिवस आलबेल होतं. मात्र नंतर वाद होऊ लागले. एका वर्षातच या दोघांनी घटस्फोट घेतला. 



बॉबीपासून घटस्फोट घेतल्यानंतर सुनीधिकडे राहायला घर नव्हतं. अशावेळी संगीतकार अनू मलिकने तिची मदत केली. तिला आपल्या घरी राहायला सांगितले. मात्र इच्छा शक्तीच्या जोरावर तिने पुन्हा सगळ्या गोष्टी सुरळीत केल्या.