मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू  केएल राहुल (KL Rahul) आणि गर्लफ्रेन्ड अथिया शेट्टी (Athiya Shetty)यांच्या नात्याच्या चर्चा सर्वदूर पसरल्या आहेत. अनेक कर्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये राहुल आणि अथिया एकत्र दिसतात. एवढंच नाही तर मैदानावर राहुलला प्रोत्साहन देण्यासाठी आथिया त्याच्यासोबत असते. दोघे सोशल मीडियावर देखील कायम ऍक्टिव्ह असतात. पण अद्यापही त्यांनी त्यांच्या नात्याला सर्वांसमोर मान्य केलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आथिया आणि राहुलने नात्याची कबुली दिली नसली तरी,  अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) दोघांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सुनीलने टीओआयला दिलेल्या मुलाखतीत आथिया आणि राहुलच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सुनीलला  लेकीच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी अद्याप गोष्टी स्वीकारल्या नाहित असं सुनील म्हणाला.



पण जेव्हा अथिया आणि राहुल ब्रँडच्या 'ब्रँड अंबेसडर' होण्यावर सुनीलवा विचारल असता, तो या प्रश्नावर म्हणाला, 'याबद्दल तुम्ही त्या दोघांना विचारलं.. जाहिरातीबद्दल बोलायचं झालं तर, एका अंतरराष्ट्रीय  ब्रँडसाठी दोघांची निवड करण्यात आली आहे.'


सुनील पुढे म्हणाला, 'दोघे गुड लुकिंग कपल आहे. आणि बँडच्या दृष्टीकोनातून पाहायचं झालं तर दोघे चांगलं काम करत आहेत. मला असं म्हणावं लागेल की, दोघेही एकमेकांसोबत जाहिरातीत चांगले दिसतात. ' सुनीलच्या या वक्तव्यावरून त्याला आथिया आणि राहुलची जोडी आवडते असं म्हणायला हरकत नाही.