मुंबई : बॉलिवूड, अभिनेत्री नरगिस दत्त यांनी एकाहून अधिक उत्तम सिनेमे दिले आहेत. यामध्ये 'बरसात', आवारा', 'श्री 420' आणि 'मदर इंडिया' या सिनेमांचा समावेश आहे. आपल्या अतिशय लहान करिअरने नरगिस यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. राज कपूर आणि नरगिस यांची ऑनस्क्रिन जोडी लोकप्रिय झाली. तसेच सुनील दत्त यांच्या प्रेमाची चर्चा देखील जोरदार झाली. आज अभिनेत्री नरगिस यांची पुण्यतिथी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही गोष्ट त्या वेळेची आहे. जेव्हा सुनील दत्त हे सिनेसृष्टीत नव्हते. पण नरगिस-सुनील दत्त यांचं लग्न झालं होतं. नरगिस यांची एंट्री बॉलिवूडमध्ये झाली होती. त्यावेळी नरगिस आणि राज कपूर यांच्या अफेअरची चर्चा आहे. सुनील दत्त त्या दरम्यान ऑल इंडिया रेडिओकरता काम करत होते. एक दिवस संजय दत्त यांनी अभिनेत्री आणि पत्नी नरगिसची मुलाखत घ्यावी लागली. तेव्हा नरगिस ही मोठी अभिनेत्री झाली होती. 


असं म्हटलं जातं की, नरगिस यांना समोरा-समोर पाहिल्यावर सुनील दत्त खूप घाबरले होते. याची दोन कारण सांगितलं जात आहेत. एकतर सुनील हे नरगिस यांच्या स्टारडमने घाबरले होते. एकतर त्या मोठ्या अभिनेत्री होत्या आणि दुसरं कारण म्हणजे सुनील दत्त हे नरगिस यांना खूप पसंत करत.  


मुलाखती दरम्यान सुनील दत्त जेव्हा बोलत असतं तेव्हा लोकं शांत होत असतं. मात्र जेव्हा नरगिस बोलायला लागायच्या तेव्हा लोकं स्तब्ध होतं. तसंच काहीस सुनील दत्त यांच्याबाबत घडलं. तेव्हा नरगिस यांनी त्यांना समझावलं की, घाबरण्यासारखं काहीच कारण नाही. त्यामुळे आरामात तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. ती मुलाखत झालीच नाही आणि या कारणाने त्यांची नोकरी मात्र धोक्यात आली. 


त्यानंतर सुनील दत्त यांनी रेडिओतील नोकरी सोडली आणि सिनेसृष्टीत पदार्पण केलं. नरगिस यांची दुसरी ओळख 'दो बीघा जमीन' यांच्या सेटवर झाली. यानंतर महबूब खान यांच्या 'मदर इंडिया' सिनेमात सुनील दत्त यांनी नरगिस यांच्या मुलाची भूमिका साकारली आणि सिनेमा हिट झाला.


असं म्हटलं जातं की, या सिनेमाच्या सेटवरच नरगिस आणि सुनील दत्त यांच्या प्रेमाची सुरूवात झाली. एक दिवस सुनील नरगिस यांना प्रपोज करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. त्यांनी प्रपोझ केलं आणि नरगिस यांनी त्या प्रेमाचा स्विकार केला. यानंतर 1958 मध्ये दोघांनी गुपचुप लग्न केलं. 1959 मध्ये दोघांनी आपल्या लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केली आणि एक रिसेप्शन केलं. 


नरगिस यांना कॅन्सरची लागण झाली होती. त्यांच्या शरिराला खूप त्रास होत होता. त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर होती. असं म्हटलं जातं की, डॉक्टरांनी सुनील दत्त यांना सल्ला दिला की, नरगिस यांचं लाइफ सपोर्ट सिस्टम काढून टाका. मात्र सुनील दत्त यांनी हे करण्यास नकार दिला. ते शेवटपर्यंत नरगिस यांच्यासोबत राहिले. अखेर 3 मे 1981 मध्ये 58 साली नरगिस यांचं कॅन्सरमुळे निधन झाले.