मुंबई : बॉलिवूडमध्ये 'अण्णा' या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अभिनेता अहान शेट्टी याने 'तडप' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर खूप कमाई केली. अहान शेट्टीच्या अभिनयाचंही सवत्र कौतुक होत होतं. याचबरोबर, अहान त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता तानिया श्रॉफला बऱ्याच काळापासून डेट करत आहे. काही दिवसांत तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करतो. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला. अलीकडेच तानियाच्या वाढदिवशी अहानने तिला स्पेशल फिल करण्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली. गर्लफ्रेंड तानिया श्रॉफच्या वाढदिवसाला अहान शेट्टी रोमँटिक होताना दिसला.


अहान शेट्टीने त्याची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफला तिच्या वाढदिवशी एका गोड पोस्टसह इंस्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या. फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवल्याचं दिसत आहे. त्याने पोस्टला कॅप्शन दिलं आहे की,, 'माझी बर्थडे गर्ल. यासोबतच त्याने तानिया श्रॉफसोबतचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघं सेल्फी घेताना दिसत आहेत. अहानने हा फोटो त्याच्या इंस्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.


आहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अहान शेट्टीची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफ फॅशन इन्फ्लुएंसर आणि डिझायनर आहे. ती तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. ती खूप स्टायलिश आउटफिट्समध्ये तिचे फोटो पोस्ट करत असते.



तानिया श्रॉफ आणि अहान शेट्टी लहानपणापासून एकमेकांना ओळखतात आणि दोघंही एकाच शाळेत शिकले आहेत. तानिया श्रॉफ संपूर्ण शेट्टी कुटुंबाच्या खूप जवळ आहे. अहानची मोठी बहीण अथिया शेट्टीसोबतही तानियाचं खूप चांगलं बाँन्डिंग आहे.


तानिया श्रॉफ ही उद्योगपती जयदेव श्रॉफ आणि रोमिला श्रॉफ यांची मुलगी आहे. ती 2015  पासून अहानसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तानिया परदेशात शिकत होती. यामुळे तानिया आणि अहान लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते पण आता दोघेही एकत्र आहेत.