मुंबई :  अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया हिचं नाव भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू, के.एल. राहुल याच्याशी जोडलं जात आहे. किंबहुना अथियाची राहुलशी वाढती जवळीक या साऱ्या चर्चांना आणखी वाव देत आहे. आता सुनील शेट्टीचा मुलगाची अशाच कारणामुळं सर्वांच्या नजरा वळवत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण ठरतंय ते म्हणजे अहान शेट्टी याची सोशल मीडिया पोस्ट. अहान येत्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. त्याआधीपासूनच त्याच्या नावाभोवती चर्चांचं वलय तयार झालं आहे. ही चर्चा होण्यास निमित्त ठरतंय ते म्हणजे अहानचं खासगी आयुष्य. 


सध्या अहान, त्याची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफ हिच्यासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. यादरम्यानच त्यांच्या या वेकेशन मूडमधील फोटो सोशल मीडियावर फॉलोअर्सचं लक्ष वेधत आहेत. ज्यामध्ये तानियाच्या मादक सौंदर्यावरच सोशल मीडिया युजर्स आणि बॉलिवूडप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत. 



तानियाचा बॉलिवूडशी थेट संबंध नाही. पण, शेट्टी कुटुंबाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ती बऱ्याचदा दिसते. तानिया सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रीय आहे. ती अनेकदा बोल्ड अंदाजातील फोटो शेअर करत असते. 


तानिया आणि अहान मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांना एकत्रही बऱ्याचदा पाहिलं गेलं आहे. पण, तूर्तास या सेलिब्रिटी कपलकडून लग्नाच्या चर्चेवर शिक्कामोर्तब किंवा रिलेशनशिपची अधिकृत ग्वाही मात्र देण्यात आलेली नाही.