Sunny Deol and Nana Patekar Video: सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे ती म्हणजे गदर 2 या चित्रपटाची. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. काल 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद येताना दिसतो आहे. जर तुम्ही सनी देओल यांच्या सोशल मीडियावरील इन्टाग्राम अकांऊटवर गेलात तर तुम्हाला कळून येईल की या चित्रपटाला देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यामुळे सध्या सनी देओल यांची चर्चा जोरात रंगली आहे. या वेळी बॉलिवूड विश्वातूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. सोबतच अनेक ज्येष्ठ आणि मान्यवर कलाकारांनीही हा चित्रपट पाहिला असून या चित्रपटाला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी खास चर्चा रंगली होती ती म्हणजे अभिनेते नाना पाटेकर यांची. नाना पाटेकर यांनी सनी देओलची या चित्रपटाच्या निमित्तानं भेट घेतली असून यावेळी त्यांनी हा चित्रपट पाहिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या भेटीची चांगलीच चर्चा रंगलेली असून यावेळी त्यांचा एक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ विरल भयानी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. चाहत्यांनी या फोटोखाली कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. अनेकांनी त्यांच्या मैत्रीवर कमेंट केली आहे. या व्हिडीओ आपण पाहु शकतो की एकमेकांना पहिल्यानंतर सनी देओल आणि नाना पाटेकर हे एकमेकांना मिठी मारतात आणि पापाराझींसोबत पोझ देतात. यावेळी ते दोघंही गदरच्या स्टाईलमध्येही पोझ देतात. सोबतच नाना पाटेकरही सनी देओल याचे कौतुक करतात. 90 च्या दशकात त्यांनीही अनेक चित्रपटांतून एकत्र काम केली आहे. तसं पाहिलं तर दोघंही एकमेकांना समवस्यक आहेत. त्यामुळे अगदी कॉलेजचा जुना यार भेटावा अशी त्यांची यावेळी मैत्री पाहायला मिळाली. 


हेही वाचा - 'ढाई किलो का हात...' भाईजाननं सनी पाजीसाठी लिहिली खास पोस्ट; वाचाच


त्यांची ही मैत्री पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकचा वर्षाव केला आहे. यावेळी एका युझरनं म्हटलंय की, ''दोन दिग्गज कलाकारांना एकत्र पाहून खूपच आनंद वाटला.'' तर दुसऱ्यानं लिहिलंय की, ''हे बॉलिवूडचे खरे स्टार आणि लेजेंन्ड्स आहेत.'' तर अनेकांनी कमेंट केली आहे की, ''नाना आणि पाजीला एकत्र पाहून आनंद झाला'' त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 


हेही वाचा - चेहऱ्यावर एक चापटी मारल्याने मिळतात अनेक फायदे, जाणून घ्या स्लॅप थेरपी


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नाना पाटेकर हे नुकतेच 'तडका' या चित्रपटातून एकत्र दिसले होते. सध्या सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 40 कोटीहून अधिक कमाई केली आहे.