मुंबई : बॉलिवूडचा हिट सिनेमा 'गदर' 2001 साली मोठ्या पडद्यावर रिलीज झाला होता. सनी देओल आणि अमिषा पटेल या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा त्या काळातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आणि या चित्रपटाने अनेक सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले. आता या सिनेमाच्या रिलीजच्या 22 वर्षांनंतर, सिनेस्टार सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल त्यांच्या ब्लॉकबस्टर सिनेमा गदर 2 चा सिक्वेल घेऊन रुपेरी पडद्यावर पोहोचले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. नुकताच सनी देओल यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे अभिनेत्याने आभार मानले आहेत. या व्हिडिओमध्ये सनी देओल तारा सिंह आणि सकीना या पात्रांना मिळालेल्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानत असतानाच चित्रपटासाठी प्रेक्षकांची माफीही मागताना दिसत आहे. 


या कारणासाठी सनी देओलने चाहत्यांची मागितली माफी 
चित्रपट स्टार सनी देओलने गदर 2 रिलीज होण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आणि म्हणाला, 'तुम्हा सर्वांना नमस्कार... मी आत्ताच उठलो आणि मला तुमच्या सर्वांशी बोलायचे आहे. कारण इतके दिवस मी आजूबाजूला फिरत आहे... तुमच्याशी बोलत आहे. आणि मला माहित आहे की तुझं तारा सिंग आणि सकीनाच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. याची वाट पाहत होतो. आणि आज तुम्ही ते कुटुंब बघणार आहात. मी एवढंच म्हणेन की हे कुटुंब जसं तुम्ही सोडलं तसंच आहे. ते एक सुंदर कुटुंब आहे. आणि तुम्ही सगळे त्याला भेटायला जाल, त्याला भेटायला जाल... मग तुम्हाला खूप आनंद होईल. आणि चुकूनही हे कुटुंब कुणाला आवडत नसेल तर चिडवू नका... माफ करा. कारण हृदयात फक्त प्रेम असावं. आणि हे फक्त कुटुंबातील सदस्यांनाच माहीत आहे. तुम्हा सर्वांवर प्रेम आहे.. ऑल द बेस्ट.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सनी देओलच्या या व्हिडिओने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ज्यानंतर लोकं या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट करत लिहिले की, गदर 2 आजचा दिवस खूप भारी असणार आहे. कारण आजचा गदर 2 चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आणि गाजणारही. तुम्हा सर्वांचे आभार. तर अजून एका यूजरने कमेंट करत म्हटलं की, 'पाजी धूम मचा देंगे.. मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला चार वेळा थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जाईन कारण हा चित्रपट नसून भावना आहे.' तर, अनेक यूजर्स हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसत आहेत.