मुंबई : सध्या सगळीकडे 'गदर 2'चा बोलबाला आहे. या सिनेमाचा बॉक्सऑफिसवर चांगलाच दबदबा आहे. मात्र नुकताच अभिनेता सनी देओल अडचणीत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.  अलीकडेच एका अहवालात असा दावा करण्यात आला होता की, अभिनेता सनी देओल कर्जात बुडाला आहे. आणि हे कर्ज फेडण्यासाठी सनी देओलच्या जुहू येथील घराचा लिलाव होऊ शकतो. मात्र असंही म्हटलं जोत होतं की, या सगळ्या प्रकरणात सनी देओलच्या मदतीला अक्षय कुमार धावून आल्याचं बोललं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अहवालात असा दावा करण्यात आला होता की, अभिनेता अक्षय कुमारने अभिनेता सनी देओलचं जुहू येथील घर वाचवण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आता, अक्षयच्या जवळच्या व्यक्तीने हा दावे पूर्णपणे खोटा असल्याचं सांगितलं आहेत.
 
याचबरोबर समोर आलेल्या अहवालात असंही म्हटलं होतं की, रविवारी, एका बँकेने सनी देओल यांना नोटीस जारी केली होती की, अभिनेत्याला दिलेले सुमारे ₹56 कोटी कर्ज वसूल करण्यासाठी सनीच्या जुहूच्या घराचा लिलाव केला जाईल. ही बातमी समोर आल्यानंतर लगेचच, अक्षय सनीच्या बचावासाठी आला आहे आणि कर्जाचा 'मोठा हिस्सा' देण्याची ऑफर दिली आहे.


''कराराचा भाग म्हणून, सनी देओलनंतर अक्षय कुमारला निर्धारित वेळेत कर्जाची परतफेड करेल,'' सनीच्या कर्जाची पुर्तता करण्यासाठी अक्षय सुमारे ₹30-40 कोटी देणार असल्याचा दावा सूत्रांनी केला होता.  याचबरोबर निवेदन दिल्यानंतर एका दिवसानंतर सोमवारी बँकेने जुहू बंगल्याच्या लिलावाची नोटीस मागे घेतली आणि त्यात तांत्रिक बिघाड असल्याचा दावा केला. मात्र हा दावा फेटळून लावत अक्षयच्या जवळच्या व्यक्तीने या केवळं अफवा असल्याचं सांगितलं आहे. 


अलीकडेच, सनी देओल-स्टारर गदर 2 आणि अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी-स्टारर OMG 2 एकाच दिवशी, 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाले आणि दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. कमाईच्या बाबतीत मात्र अक्षयच्या सिनेमाला गदर 2 मागे टाकलं आहे. 


बॉलिवूड अभिनेता  सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्याचा इतिहास रचणार असे चाहते म्हणत होते.