`सडलेलं बॉलिवूड नाही तर...`, चित्रपटसृष्टी आणि ड्रग्स कनेक्शनवर सनी देओलचं रोखठोख मत
Sunny Deol : सनी देओल हा नेहमीच विविध कारणांंमुळे चर्चेत असतो. पण सध्या त्याचं चर्चेत असण्याचं कारण हे `गदर 2` हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सनी देओलनं चित्रपटसृष्टी आणि ड्रग्स कनेक्शनवर वक्तव्य केलं आहे.
Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या ‘गदर 2’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. जिथे तिथे आपल्याला ‘गदर 2’ आणि त्याशिवाय सनी देओलचा लूक हा चर्चेत आहे. इतक्या वर्षांनंतर ‘गदर’ चा रिमेक आला आहे. हे पाहता आता प्रेक्षकांना असलेला आनंद प्रचंड वाढला आहे. तर सनी देओल याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी सनी देओलनं बॉलिवूडला नशा (ड्रग्स) करण्याचा अड्डा म्हटलं जाण्यावर वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता सनी देओल आणि ड्रग्स प्रकरण हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
सनी देओलनं नुकतीच आज तकला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सनी देओल बॉलिवूडला नशा करण्याचा अड्डा बोलण्यावर वक्तव्य केलं आहे. यावेळी सनी देओल म्हणाला की 'सडलेलं बॉलिवूड नाही, तर सडलेलं लोक आहेत, आणि हे लोक कोणत्या फिल्डमध्ये नाहीत ते सांगा. आम्ही ग्लॅमरच्या विश्वास आहोत त्यामुळे लोक आमच्यावर बोटं ठेवतात. त्यांना त्यात मज्जा येते. ड्रग्ससा कोणत्याही प्रोफेशनसी जोडू नका. प्रोफेशन नशा करत नाही तर व्यक्ती करते, यात प्रोफेशनला कारण ठरवण चुकीचं आहे.
फक्त याच मुलाखतीत नाही तर या आधी दिलेल्या मुलाखतीत डेक्कन क्रॉनिकलला देखील मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सनी म्हणाला, 'मी माझ्या पूर्ण आयुष्यात मद्यपान, ड्रग्स आणि पार्टी यांच्यापासून लांब राहिलो आहे किंवा मी तसं ठेवलंच आहे. मी वर्कआउट करतो आणि शिस्तप्रिय आयुष्य जगतो. या कारणामुळे मी खूप हेल्दी फील करतो आणि त्यासोबत हेल्दी दिसतोही.
हेही वाचा : 'पैशांसाठी ललित मोदींबरोबर' या टीकेवर सुष्मिता सेनची पहिली प्रतिक्रिया! संतापून म्हणाली...
ड्रग्स प्रकरण हे 2020 साली सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केल्यानंतर सुरु झाले होते. त्यानंतर इंडस्ट्रीतील अनेकांवर बोट ठेवण्यात आली होती. सुशांत ड्रग्स वापरत असल्याचा दावा अनेकांनी केला. यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड इंडस्ट्री आणि ड्रग्स प्रकरण समोर आलं होतं. 'गदर 2' हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी देओल शिवाय या चित्रपटात मनीष वाधवा, अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत.