मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सनी एक स्पष्टपणे बोलणारी व्यक्ती आहे. मग तिचा पास्टच्य संबधित गोष्ट असो किंवा मग दुसरं काही, ती आपली गोष्ट बोलायला लाजत नाही. सनीचे इंस्टाग्रामवर खूप फॉलोअर्स आहेत. जे अभिनेत्रीला प्रत्येकवेळी सपोर्ट करतात. मात्र चुलबुली नटखट दिसणाऱ्या सनी लिओनीच्या बाबतीत खूप कमी लोकांना माहिती आहे की, ती एक  इंट्रोवर्ट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना कपूर खानच्या व्हॉट वुमन वॉन्ट या टॉक शोमध्ये सनी लिओनी पाहुणी म्हणून आली होती. तेव्हा करिनाने तिला एक प्रश्न विचारला होता की, अशी कोणती गोष्ट आहे जी तिने केली नाही पण ती तिला करायला हवी होती? 


या प्रश्नाला उत्तर देत सनीने सांगितलं की, ती एक  इंट्रोवर्ट आहे आणि सामाजिकदृष्ट्या फारशी सक्रिय नाही. अभिनेत्री म्हणाली, ''मी एक गोष्ट खूप आधी करायला हवी होती, ती म्हणजे सामाजिक असणं. मी या बाबतीत खूप वाईट आहे. मी  इंट्रोवर्ट आहे. अभिनेत्रीने सांगितलं की, तिला सामाजिकदृष्ट्याही लाजिरवाणे व्हावं लागतं.


या टॉक शोमध्ये सनीने पती डॅनियल वेबरचंही कौतुक केलं होतं. अभिनेत्रीने सांगितलं की, ती खूप भाग्यवान आहे की डॅनियल तिचा नवरा आहे, सनीने सांगितले की डॅनियल घरातील, मुलांची, स्वयंपाकघरातील भांडी धुण्यापासून ते मुलांचं डायपर बदलण्यापर्यंत अशी खूप काळजी घेतो. सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण तरीही दोघांमध्ये खूप गोड आणि रोमँटिक बाँड आहे.