सनी लिओनी बायोपिक ; दुसऱ्या सीजनचा ट्रेलर प्रदर्शित
करणजीत कौर म्हणजे बॉलिवूडची बेबी डॉल सनी लियोनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मुंबई : करणजीत कौर म्हणजे बॉलिवूडची बेबी डॉल सनी लियोनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या नृत्य आणि अदांनी प्रेक्षकांवर भूरळ घालणाऱ्या सनीने डिजिटल प्लॅटफॉर्मवर वर्चस्व सिद्ध केले आहे. 'करनजीत कौर द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन' बायोपिक वेब सिरीजचा पहिला सीजन चांगलाच गाजला.
आता 'करनजीत कौर द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन' च्या दुसऱ्या सीजनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होऊन फक्त तीन दिवस झाले आहेत. पण हा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा ट्रेलर ४५ लाख ७५ हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. बायोपिकच्या या दुसऱ्या सीजनमधून सनीच्या आयुष्यातील स्ट्रगलचा दुसरा फेज प्रेक्षकांसमोर येणार आहे.
वेब सिरीजचे दुसरे सेशल प्रिमियर झी 5 अॅपवर १८ सप्टेंबरपासून प्रदर्शित होईल. या वेबसिरीजचे दिग्दर्शन आदित्य दत्त यांनी केले आहे. यातही सनीचं स्वतःची भूमिका साकारणार आहे.