मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. कधी आपल्या फोटोंमुळे तर कधी व्हिडिओमुळे. आता सनीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडिओत सनी सिक्युरिटी गार्डसोबत डान्स करत आहे. या व्हिडिओत तिच्यासोबत नवरा डॅनिअल वेबर देखील दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ सनीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सनीचा हा अंदाज देखील लोकांना खूप पसंत आला आहे. सनी आपल्या पोस्टमुळे अनेकदा चर्चेत असते. असंच काहीस या व्हिडिओमुळेही झालं आहे. या व्हिडिओ खाली चाहत्यांनी खूप कमेंट केले आहेत. 



सनी आता आपल्या बायोपिक 'करणजीत कौर द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन' यामध्ये सनीचा सगळा काल उलघडला. सनीने एका मुलाखतीत आपल्याला वर्ल्डवाइड पॉपुलर अमेरिकन शो 'गेम्स ऑफ थ्रोन्स' मध्ये रोलसाठी ऑफर करण्यात आली होती. मात्र तिने हा रोल पाहण्यासाठी नकार दिला. सनीने मुलाखतीत सांगितलं की, माझ्याशी एका व्यक्तीने संपर्क साधला आणि सांगितलं की, आम्ही तुम्हाला यामध्ये रोल देऊ इच्छितो. या ऑफरबद्दल ऐकताच मला धक्का बसला. विश्वासच होत नव्हता की, हे असं कसं असू शकतं.