सनी लिओनीने असं केलं नववर्षांच स्वागत
पाह फोटो
मुंबई : बॉलिवूडची बेबी सनी लिओनी सध्या आपल्या नवऱ्यासोबत डेनियल वेबरसोबत खूप वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघं पूलमध्ये क्वालिटी टाइम घालवताना दिसले.
यावेळी सनी लिओनीने आपला नवरा आणि मित्र परिवारासोबत पार्टी करताना दिसली. या पार्टीत ती अतिशय मस्ती करताना दिसली.
सनी लिओनी सध्या सिनेमांपासून दूर आहे. ती तिचा बराचसा काळ मित्रपरिवारासोबत घालवत आहे. तिच्या आणि डेनियलच्या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंत केलं जात आहे.
सनी लिओनी न्यू ईअर सेलिब्रेशनची खूप मजा करताना दिसली. तिने मुंबईतच या पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्या फोटोंमध्ये तिचे जवळचे मित्र देखील दिसत आहेत.
सनीने हे सगळे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. सनी आतापर्यंत नवीन वर्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसली आहे. मात्र आता ती कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे.
सनी लिओनीच आता कोणतंच आयटम गाणं आलेलं नाही. ती गेल्या काही दिवसांपासून 'करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' सिझन 2018 मुळे खूप चर्चेत आली आहे.
सनी लिओनीने 2013 मध्ये जॅकपॉट, 2015 मध्ये एक पहेली लीला, 2016 मध्ये मस्तीजादे, 2016 मध्ये बेइमान लव सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 2012 मध्ये तिने 'जिस्म' सिनेमातून डेब्यू केलं आहे.