Cheating Case Against Sunny Leone: अभिनेत्री सनी लिओनीविरोधात (Sunny Leone) मागील 3 वर्षांपासून फसवणुकीचा एक खटला केरळ हायकोर्टात (Keral High Court) सुरु आहे. सनीबरोबर अन्य 2 लोकांविरोधातही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये केरळ हायकोर्टाच्या एका न्यायाधिशांनी सनीविरोधात कोणताही आपराधी स्वरुपाचं प्रकरण पुढे नेणं योग्य ठरणार नाही असं म्हटलं आहे. अभिनेत्रीला कारण नसताना त्रास दिला जात असल्याचं निरिक्षणही न्यायाधीशांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 31 मार्च रोजी होणार आहे. सनीविरोधात कोच्चीमधील पेरुंबवूर येथे राहणाऱ्या एम शियासने तक्रार दाखल केली आहे.


30 लाखांचं प्रकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तक्रारदार एम शियासने आरोप केला आहे की सनी लिओनी, तिचा पती डॅनियल वेबर आणि त्यांचा मॅनेजर सुनील रजनी यांनी आपली फसवणूक केली आहे. एका इव्हेंटसंदर्भात झालेल्या कराराचं उल्लंघन या तिघांनी केलं आहे. सनी लिओनीनेही एक याचिका दाखल करत कोर्टाला या प्रकरणासंदर्भातील माहिती दिली आहे. माझ्या मॅनेजरने एम शियासने दिलेल्या तारखांना आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी 30 लाखांची रक्कम दिली होती. मात्र एम शियासने नंतर अनेकदा तारखा बदलल्या, असं सनी लिओनीने म्हटलं आहे. 


एवढे व्हेन्यू बदलले


सनी लिओनीचा हा कार्यक्रम फेब्रुवारी 2019 मध्ये मी सुट्ट्यांसाठी केरळमध्ये जाणार होते तेव्हा आयोजित करण्यात आला होता. मात्र तक्रारदार एम शियासन केलेल्या दाव्यानुसार सनी लिओनीने अगाऊ पेमेंट घेऊनही कार्यक्रमाला उपस्थिती लावली नाही. पूर आणि इतर वेगवेगळ्या कारणांमुळे कार्यक्रमाच्या तारखा आणि वेळ बदलण्यात आल्याची माहिती तक्रारदाराने कोर्टाला दिली. तक्रारदाराने हा कार्यक्रम कोझिकोडमध्ये होणार होता असं म्हटलं आहे. नंतर लोकेशन बदलून कन्नूर, तिरुवनंतपुरम आणि नंतर चेन्नईमध्ये ठरवण्यात आला. सनी लिओनी, तिचा पती आणि मॅनेजरविरोधात भारतीय दंड संहितेअंतर्गत कलम 406, 420 आणि 34 चं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)


सनी पैसे परत द्यायला तयार होती पण...


तपासादरम्यान सनी लिओनीने कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तसेच ते शक्य न झाल्यास पैसे परत करण्यास तयार होती असं सांगितलं. मात्र आयोजकांचा चालढकलपणामुळे कोणताच निर्णय घेता आला नाही, असंही सनीने म्हटलं आहे.