सनी लियॉनीशिवाय `हे` काम मी करुच शकत नाही- डॅनियल वेबर
या दोघांचं खूप चांगल बॉंडींग आपण याआधीही पाहीलंय. पण आता...
मुंबई : सनी लयॉनीला आपल्या नवऱ्याचं कौतूक सांगताना आपण खूपदा ऐकलंय. माझा पती डॅनियल वेबर माझी ताकद असल्याचे सनी लियॉनीने अनेकदा सांगितलंय. या दोघांचं खूप चांगल बॉंडींग आपण याआधीही पाहीलंय. पण आता सनीचं कौतूक करताना डॅनियलला शब्द कमी पडू लागले आहेत. 'माझ्या आयुष्यातला असा कोणता क्षण नाहीए जेव्हा मी सनीचा सल्ला घेतला नाही', असे डॅनियल वेबर सांगतो.
माझी बायको आणि मुलं हेच माझं आयुष्य असल्याचेही तो सांगतो. मी आयुष्यात जे काही करतो त्या सर्वामध्ये सनीचा प्रभाव असतो असे डॅनियल सांगतो.
'आमची सर्वांवर चर्चा'
आम्ही सर्वांवर चर्चा करतो. केवळ पती-पत्नीच्या नात्याचीच नाही तर बिझनेस संदर्भातही आमच्या चर्चा होतात. माझ्या आयुष्यात असा कोणता क्षण नाही जिथे मी सनीचा सल्ला घेतला नाही, असे डॅनियलने सांगितले.
'त्याला खूप काळ लोटला'
हा आमचा एकमेकांप्रती असलेला आदर आहे. आम्ही एकमेकांना त्यांची स्पेस आणि रिस्पेक्ट देतो तसेच एकमेकांचे विचार ऐकून घेतो. पत्नीचा सल्ला न घेता निर्णय घेतलेल्यास आता खूप काळ लोटून गेल्याचे त्याने सांगितले.