मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी कायन सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. शिवाय तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. नुकताचं तिने MTVवरील स्पलिट्सविलाच्या सेटवर काढलेला एक फोटो शेअर केला आहे. सनीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सनीसोबत को-होस्ट रणविजय सिंह (Ranvijay Singh) देखील दिसत आहे. सनी तिचा मोबाईल रणविजयला दाखवत आहे. तर रणविजयच्या हातात देखील त्याचा मोबाईल आहे. सनी, रणविजयला मोबाईलमध्ये नक्की काय देखवत आहे? असा प्रश्न चाहते तिला विचारणार असं तिला ठावूक होतं. 



म्हणून सनीने फोटो शेअर करत कॅप्शन देखील दिलं आहे. 'जर तुम्ही सांगू शकाल माझ्या फोनमध्ये असं काय होतं?' सनीच्या या फोटोवर काही तासांमध्ये 9 लाखपेक्षा जास्त लाईक्स आणि अनेकांनी तिची ही पोस्ट शेअर देखील केली आहे. तर सनीच्या या फोटोवर अनेकांनी कॉमेंट बॉक्सवर उत्तर देखील दिलं आहे. 


एक युजर कॉमेंट करत म्हणाली, की 'मोबाईलमध्ये IGTVकसं सुरू करतात? असं विचारत असाल?' तर दुसरा युजर कॉमेंट करत म्हणाला की, 'रणविजय सनीला सांगत आहे की सनीला स्प्लिट्सविलाचा विजेता सांगा' सध्या सनीची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.