मुंबई :  अभिनेत्री सनी लियोनी तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजामुळे चांगलीच चर्चेत असते. त्याचप्रमाणे तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती आपल्या दैनंदीन जीवनातील घडामोडी चाहत्यांना कळवत असते. त्याचप्रामाणे चाहत्यांसह संवाद देखील साधत असते. सध्यातिचा बिहारी भाषेतील व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सनी लवकरच 'कोकाकोला' चित्रपटात भूमिका साकारणार आहे. भयावह चित्रपटासाठी सनी बिहारी भाषा शिकत असल्याचे समोर येत आहे. खुद्द सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी 'JCB की खुदाई' हा ट्रेंड सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत होता.  बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीने स्वत:चा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या फोटोमध्ये ती एका JCB मशीनवर उभी होती. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'Career change!? LOL' असे लिहिले होते. 


त्यानंतर 'JCB की खुदाई' हा ट्रेंड चांगलाच गाजला होता. 'JCB की खुदाई' या ट्रेंड नंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम देखील व्हायरल झाले होते. 'जिस्म २' चित्रपटाच्या माध्यमातून सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.