मुंबई : सध्या अभिनेत्री सनी लिओनीच्या चर्चा तुफान रंगत आहेत. रंगलेल्या या चर्चेमागचं कारण देखील तसचं आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची आणि मृतांची स्थिती पाहता सनीने पती डॅनिअल वेबर आणि त्यांच्या तीन मुलांसह लॉकडाऊन काळात भारत सोडला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. भारतातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि मुलांचा विचार करून अमेरिकेत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. असं तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भारतात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता माझ्या मुलांसाठी अमेरिकेतली लॉस एंजिलिसमधील घर अधिक सुरक्षित आहे. अमेरिकेत येण्याचा निर्णय मी माझ्या मुलांसाठी घेतला.' एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये अमेरिका अधिक सुरक्षित असल्याचे तिने म्हटलं आहे. 



शिवाय पती डॅनिअल वेबरने देखील त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वतःचा फोटो पोस्ट करत 'क्वारंटाइन भाग २' असं कॅप्शन दिलं आहे. 


सांगायचं झालं तर कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेकांनी आपले जीव देखील गमावले. अमेरिका, इटली, स्पेन यांसारख्या देखील कोरोनाची दहशत मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अशा परिस्थितीत सनीने तिच्या मुलांसाठी अमेरिकेत जाण्याचा घेतलेला निर्णय चर्चेचा विषय बनला आहे.