मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर भरपूर अॅक्टिव असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करण्यात ती कायम व्यस्त असते. नुकताच तीने आपला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोवर युझर्सने कमेंट करून ट्रोल केलं आहे. सनी आता लोकप्रिय शो मॅन वर्सेस वाइल्ड च्या शुटिंगमध्ये बिझी आहे. याच गोष्टीची माहिती तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. 



सनीने कलर्स टीव्हीच्या बिग बॉस शोमध्ये देखील काम केलं आहे. त्यानंतर तिने  बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. सनी लिओनीने अनेक लीड रोल केले असून अनेक सिनेमांत आयटम साँग देखील केले आहेत. पॉर्न स्टार असलेल्या या सनीला बॉलिवूडने अभिनेत्री म्हणून स्विकारलं आहे. 



सनीच्या या फोटोखाली चाहत्यांनी कमेंट केली आहे की, कोणत्या सिनेमाचं शुटिंग करत आहे. एवढंच नाही तर अनेकांनी तिला कमेंटमध्ये पॉर्न स्टार देखील म्हटलं आहे. आता सनी बॉलिवूड स्टार आहे.