मुंबई : अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री सनी लियोनी चाहत्यांसाठी प्रचंड ओळखीचे चेहरे आहेत. तर या दोघांसंबंधीत एक बातमी सध्या चांगलीच चर्चेत आहे. सनी लियोनीने चक्क सनी देओलची माफी मागितली आहे. ४०० लोकांसमोर तिने सनी देओलची माफी का मागीतली? असा प्रश्न तुम्हाला देखील नक्कीच पडला असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सिंगापूरमध्ये इन्टरनॅशनल भोजपुरी फिल्म अवॉर्ड सोहळा रंगत आहे. या सोहळ्यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार देखील उपस्थित आहेत. ज्यामध्ये अभिनेता सनी देओल, अभिनेत्री सनी लियोनी आणि जरीन खान देखील आहे. 



त्याचप्रमाणे भोजपुरी कलाक्षेत्रातील सुपरस्टार मनोज तिवारी, रवि किशन आणि निरहुआ देखील उपस्थित आहेत. तर ४०० लोकांसमोर तिने सनी देओलची माफी का मागितली असावी, हे जाणून तुम्ही देखील चक्क व्हाल. 


'मी तुमची माफी मागते. कारण तुमचं आणि माझं नाव देखील सनी आहे. त्यामुळे अनेक मिम्स आणि जोक व्हायरल होतात.' नाव सारखं असल्यामुळे तिने सनी देओलची माफी मागीतली. 


शिवाय सनी लियोनी सोशल मीडिया कायम सक्रिय असते. ती नेहमी फोटो व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.