मुंबई : पंजाबी सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनेत्रीची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री दलजीत कौर (Daljeet Kaur) यांचे दीर्घ आजारानं निधन झाले आहे. पती हरमिंदर सिंग देओलच्या अपघाती निधन झाले. त्यानंतर दलजीत कौर यांनी चित्रपटात काम करणं बंद केलं. पतीच्या निधनानंतर त्या आजारी होत्या. लुधियाना शहरातील गुरुसर सुधार (हलवारा) आणि त्यांचा भाऊ हरजिंदरसिंग खानगुडा यांच्याकडे राहत होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

69 वर्षीय दलजीत कौर यांनी दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्या पुण्यतील नॅशनल स्कूल ऑफ फिल्म अँड ड्रामामध्ये आल्या आणि त्यांनी डिप्लोमाची पदवी घेतली. यानंतर 1976 मध्ये दलजीत कौर यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. दलजीत यांनी 2001 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि त्यांच्या वयानुसार दलजीत यांनी आई आणि काही सहाय्यक भूमिका साकारल्या. (Punjabi actress Daljeet Kaur) 



दलजीत यांनी 10 हून पेक्षा जास्त हिंदी आणि 70 पेक्षा जास्त पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. दलजीत यांनी याशिवाय सिंग व्हर्सेस कौर किंवा गिप्पी ग्रेवाल यांच्या आईची भूमिका साकारली आहे. सिंग वर्सेस कौर या पंजाबी चित्रपटात त्यांनी गिप्पी ग्रेवालच्या आईची भूमिका साकारली होती. (Daljit kaur demise)


अभिनय नाही तर या क्षेत्रातही दलजीत कौर यांनी उत्तम कामगिरी केली आहे.


दलजीत या फक्त अभिनेत्री नाही तर त्यांनी कबड्डी आणि हॉकीच्या राष्ट्रीय खेळाडू होत्या. दलजीत यांचा जन्म 1953 मध्ये पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे झाला होता. दलजीत त्यांचे गंभीर मानसिक आजारी राहत होत्या. गंभीर आजारांमुळे त्या गोष्टी विसरू लागल्या होत्या. त्यानंतर दलजीत यांच्या भावानं त्यांचा सांभाळ केला. शेवटच्या काळात त्यांच्या भावानेच त्यांचा सांभाळ केला. गेल्या 12 वर्षांपासून त्या भावाकडे राहात होत्या. (Superhit Punjabi Film Actress Daljeet Kaur No More)