मुंबई : सिनेविश्वातील सर्वात प्रभावशाली स्टार्सपैकी एक असलेल्या रजनीकांत यांनी चाहत्यांच्या मनात घर केलंय. रजनीकांत यांना साऊथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार म्हटलं जातं,  एवढंच नाही तर ते भारतीय सिनेविश्वाचे मेगास्टार देखील आहेत. जगभरातील त्यांचे असंख्य चाहते आहेत. आपल्या सिनेमांनी प्रत्येक रेकॉर्ड तोडणाऱ्या रजनीकांत यांचा आज वाढदिवस. 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरूमध्ये जन्मलेले रजनीकांत आता 71 वर्षांचे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अपूर्व रागंगल' सिनेमातून अभिनयाची सुरुवात करणारे रजनीकांत आज करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, रजनीकांत यांची एकूण संपत्ती 365 कोटी रुपये आहे. एका वर्षात रजनीकांत आपल्या सिनेमांच्या फीमधून 50-60 कोटी कमावतात. 



साऊथ इंडस्ट्री आणि बॉलिवूड गाजवणारे 'रजनी' आज रॉयल आयुष्य जगतात. चेन्नईमध्ये रजनीकांत यांचं भव्य घर आहे जे 2002 मध्ये बांधले गेले. या घराची भव्यता पाहण्यासारखी आहे.  देशाच्या अनेक भागात रजनीकांत यांची संपत्ती आहे. एवढंच नाही तर त्यांनी अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे.


रजनीकांत यांना महागड्या आणि आलिशान वाहनांची खूप आवड आहे. त्यांच्याकडे टोयोटा इनोव्हा, रेंज रोव्हर, बेंटली अशा गाड्या आहेत. रजनीकांत यांनी करेंट एसेट्समध्ये 100 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याचं सांगितलं जातं. 



भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना भारताचा तिसरा सर्वोच्च सन्मान शिवाय पद्मभूषण सन्मानही मिळाला आहे. एवढंच नाही तर त्यांना त्यांच्या अभिनयाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.