मुंबई : सुप्रीम कोर्टाने संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमाला हिरवा कंदील दाखवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोर्टाने प्रत्येक राज्यांना सांगितले आहे की, सिनेमा प्रदर्शित झाल्यावर सगळीकडे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी. गुरूवारी या सिनेमाची सुनावणी असताना प्रोड्युसर आणि डायरेक्रट यांच्याकडून हरिश साळवे आणि मुकुल रोहतगी उपस्थित होते. राज्य सरकारकडून अॅडिशनल सॉलिसीटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते. 


बँडिट क्वीनचा केला उल्लेख 


सुप्रीम कोर्टाने म्हटलं की आम्ही एका गोष्टीने फार आश्चर्यचकित आहोत. सेंसर बोर्डाने सिनेमाला प्रमाणपत्र दिलं असलं तरीही या सिनेमाला एक्सक्युटिवद्वारे बॅन कसे करण्यात आले. सुप्रीम कोर्टाने टिपणी देताना म्हटलं की, बँडिट क्वीन सारख्या सिनेमांना सुप्रीम कोर्टाने हिरवा झेंडा दाखवला असला तर पद्मावत सिनेमाला का दिलेला नाही. 


पद्मावत या सिनेमाला सेन्सर बोर्डाने सर्टिफिकेट देऊनही या सिनेमाला कडाडून विरोध होत आहे. मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमधून सिनेमाला कडाडून विरोध होत आहे.