Supriya Pathare Birthday: अभिनेत्री सुप्रिया पाठारे या आपल्या आगळ्यावेगळ्या विनोदशैलीसाठी (Supriya Pathare Comedy) ओळखली जाते. आज सुप्रिया पाठारे यांचा वाढदिवस आहे. प्रत्येक कलाकार हा कुठल्या ना कुठल्या तरी कठीण प्रसंगातून, संघर्षातून जात असतोच. त्याचप्रमाणे अभिनेत्री सुप्रिया पाठारे (Supriya Pathare Struggle Story) यांचा प्रवासही खडतर राहिला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या संघर्ष हा अनेकांना प्रेरणा देणारा ठरला आहे. शून्यातून विश्व उभं करणारे कलाकार हे आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यापैंकी एक आहे अभिनेत्री सुप्रिया पाठारे. फक्त विनोदी भुमिकाचा नाही तर गंभीर भुमिकांसाठीही त्यांच्या अभिनयाचे (Supriya Pathare in Chala Hawa Yeu Dya) कौतुक झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रिया यांनी अनेक मराठी मालिकांमधून कामं केली आहेत परंतु 2010 सालापासून सुरू झालेल्या फू बाई फू या विनोदी मालिकेमुळे आणि 2013 साली झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या होणार सुनं मी या घरची या मालिकेमुळे त्यांना घराघरात एक वेगळी ओळख मिळाली. फू बाई फूमध्ये (Supriya Pathare Fu Bai Fu) सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम यांची जोडी बरीच गाजली होती. त्यांच्या कॉमडी स्किटचे सगळीकडेच कौतुक व्हायचे. त्याचे कॉमेडी स्कीटचे (Supriya Pathare Comedy Video) व्हिडीओज हे आजचेही इंटरनेटवर तूफान व्हायरल होतात. कॉमेडीचे अचूक टायमिंग साधण्याची त्यांची शैली ही अनेकांना आवडते. 


संघर्षमय प्रवास 


सुप्रिया पाठारे यांचा प्रवास सोप्पा नव्हता. आज मोठमोठ्या मालिकांमधून उत्कृष्ट अशा भुमिका निभावलेल्या सुप्रिया पाठारे यांनी एकेकाळी धुणी-भांडी (Supriya Pathare Story) करण्याचेही कामं केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुप्रिया पाठारे या भरतनाट्यम क्लासेसला जायच्या त्यासाठी त्यांना 70 रूपये भरायचे असायचे. ही फी भरण्यासाठी त्या धुणी भांडी करायच्या आणि त्यातून त्यांना जे शंभर रूपये मिळायचे ते त्या आपल्या क्लासच्या फीसाठी भरायच्या. उरलेले 30 रूपये त्या आईला द्यायच्या. अशाप्रकारे त्या 18 घरात जाऊन हे काम करायच्या. 


त्यांच्या अभिनय कारकीर्दीची (Supriya Pathare Movies) सुरूवातही नाटकांपासून झाली. त्यांनी 'फू बाई फू', 'जागो मोहन प्यारे', 'होणार सुन मी या घरची', 'मोलकरीण बाई', 'चि. व चि.सौ.का' अशा लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांमधून कामं केली आहेत. सध्या त्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून दिसत आहेत.



त्यांचा स्वभावही हलकाफुलका आणि मनमिळाऊ आहे. त्या कायमच आनंदी आणि हसऱ्या असतात. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांचा मुलगा फूड ट्रक चालवतो. शाळेत बाईंची नक्कल करताना त्यांना दुसऱ्या एका बाईंनी पाहिले आणि त्यांना नाटकात काम करण्याची संधी दिली. त्याची बहीण अर्चना नेवरेकर (Supriya Pathare Sister Name) त्यांना 100 रूपये द्यायच्या.