मुंबई : बॉलिवूडमध्ये बोल्ड आणि बिंदास म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सुरवीन चावलाने चाहत्यांसाठी एक खास बातमी शेअर केली आहे. सुरवीन लवकरच आई होणार असून तिने बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सुरवीनने इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. या फोटोमध्ये सुरवीन पारंपारिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही पेहरावात दिसत आहे.





COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधीही सुरवीनने बेबी बंपसह अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सुरवीनच्या फोटोजना सोशल मीडियावर मोठी पसंती दिली जात आहे. सुरवीर छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'कसौटी जिंदगी की', 'काजल और कही तो होगा' यांसारख्या टीव्ही सिरियल्यमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. 'हेट स्टोरी 2', 'वेलकम बॅक', 'पार्च्ड' यांसारख्या चित्रपटातून तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.  





सुरवीनने व्यावसायिक अक्षय ठक्करशी विवाह केला आहे. सुरवीन आणि अक्षयने अचानक लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. 2015 साली सुरवीन आणि अक्षय यांचं आधीच लग्न झाल्याची माहितीही समोर आली होती. त्यानंतर 2017 साली आपल्या लग्नाला ऑफिशियल करत सर्वांसमोर याचा खुलासा केला होता.