मुंबई : बहुचर्चित 'छिछोरे' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. आज रिलीज करण्यात आलेल्या या ट्रेलरला दोस्ती स्पेशल असं नाव देण्यात आलं आहे. फ्रेंडशिप डेच्या दिवशी 'छिछोरे'चा पहिला ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'छिछोरे'चा दोस्ती स्पेशल ट्रेलर प्रत्येकाला त्याच्या कॉलेजच्या दिवसांची, कॉलेजमध्ये, हॉस्टेलमध्ये केलेल्या मजा-मस्तीची नक्कीच आठवण करुन देईल. चित्रपटातील स्टारकास्टही प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी तयार असल्याचंच या ट्रेलरमधून समजतंय. 


श्रद्धा कपूरनेही ट्विटरवर छिछोरे ट्रेलर शेअर केला आहे.



चित्रपटाचं कथानक इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांवर केंद्रित असून विद्यार्थी अभ्यासात कमी आणि इतर कामांमध्येच अधिक लक्ष देताना दिसतात. चित्रपटाचं शूटिंग एका इंजिनियरिंगच्या कॉलेजमध्ये करण्यात आलं आहे. सुशांत, श्रद्धाने प्रमुख भूमिका साकारली असून प्रतीक बब्बर सुशांतच्या मित्राची भूमिका साकारत आहे. 



'छिछोरे'मध्ये सुशांत  सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिका साकारत आहेत. सुशांत, श्रद्धाव्यतिरिक्त चित्रपटात कॉनेडियन वरुण शर्मा, नवीन शेट्टी, सहर्ष कुमार, ताहिर राज भसीन, तुषार पांडे आणि प्रतीक बब्बरही भूमिका साकारणार आहे. 


'छिछोरे'चं दिग्ददर्शन 'दंगल' चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टूडियोज आणि साजिद नाडियावाला यांनी केली आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी 'छिछोरे' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.