मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्युला ३ दिवसानंतर एक वर्ष होणार आहे. इतक्या लवकर जगाचा निरोप घेऊन गेल्याने त्याचे चाहते नाराज आहेत. सुशांतची आठवण आज ही अनेक जण सांगताना भावूक होतात. चित्रपट दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा याने देखील सुशांत सोबतच्या आठवणी जागवताना त्याची एक इच्छा देखील सांगितली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतसिंह राजपूत एक उत्तम अभिनेता तसेच एक उत्तम डान्सर होता. 'झलक दिखला जा' या डान्स शोमध्येही तो सहभागी झाला होता आणि त्यामध्ये तो दुसरा रनर अप देखील ठरलेला. याच शोमध्ये रेमो डिसुझा हा जजच्या भूमिकेत होता. रेमो डिसूझाने या शो संदर्भात अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत आणि सुशांत सिंह राजपूतच्या आठवणी ही जागवल्या आहेत.


अलीकडेच टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना रेमो डिसूझाने सांगितले की, 'सुशांतने मला सहजपणे सांगितले की सर तुम्हाला माहित आहे की मी एक चांगला डान्सर आहे, चला एकत्र डान्स फिल्म करूया.' 


रेमो डिसूझा आणि सुशांतसिंह राजपूत यांची भेट २०१० मध्ये 'झलक दिखला जा' च्या सेटवर झाली होती. सुशांतच्या नृत्य कौशल्यांबद्दल बोलताना रेमोने सांगितले की सुशांत एक उत्तम डान्सर होता. झलक दिखला जा मधील त्याच्या पहिल्या परफॉरमेंसपासून आम्हाला माहित होते की तो हा शो जिंकू शकतो. माझ्यासाठी तो विजेता होता. मला आश्चर्य वाटले की तो हरला.'


रेमो पुढे म्हणाला की, 'माझा नेहमीच विश्वास आहे की एकतर आपण जन्मताच डान्सर असता किंवा आपण प्रशिक्षित डान्सर आहात. सुशांत दोघांचे मिश्रण होते.'